कोपरगाव प्रतिनिधी/ सकल दिगंबर जैन समाज कोपरगाव – दिगंबर जैन मुनी अक्षय सागर महाराज यांच्या प्रेरणेने सकल दिगबर जैन समाज कोपरगांव आयोजित पुर्णायु आयुर्वेद BB चिकीत्सालय आणि अनुसंधाना विद्यापीठ जबलपुर आणि श्री धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था ,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेद निदान तथा पंचकर्म चिकीत्सा शिबीर शुक्रवार दिनाक २८ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत व्यापारी धर्मशाळा कोपरगांव येथे मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.
धुळे येथील प्रसिद्ध डॉ. प्रवीण जोशी व गौरव शहा यांचे शुक्रवार दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ यावेळात आयुर्वेद वरील उपचार पद्धती यावर व्याख्यान होणार आहे. दिगबर जैन समाजाचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य प्रभावक अक्षय सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने सकल दिगंबर जैन समाज कोपरगांव आयोजित पुर्णायु आयुर्वेद चिकीत्सालय आणि अनुसंधाना विद्यापीठ जबलपुर आणि श्री धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था ,धुळे व भांगचंद मानिकचंद ठोळे यांच्या उद्योग समुहाच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयुर्वेद निदान तथा पंचकर्म चिकीत्सा शिबीर शुक्रवार दिनांक २८ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यत रोज सकाळी ८ ते दुपारी१२ पर्यंत व्यापारी धर्मशाळा कोपरगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या भव्य आयुर्वेद निदान तथा पंचकर्म चिकीत्सा शिबीरात संधीवात ,आमवात, पक्षघात, मानदुखी, मणक्याचे आजार, वारंवार होणारी सर्दी, अॅलर्जी, त्वचा विकार(पिंपल्स),पचनाचे विकार, अपचन, मलबध्दता, वंध्यत्व,स्त्रीरोग विकार, कोविड नंतरचे आजार व दुर्बलता,मनोरोग आदि आजारासाठी तपसाणी व उपचार देण्यात येणार आहे.
याशिबीरासाठी तज्ञ डॉक्टर्स रामदास आव्हाड, प्रविण जोशी, मनोज पाटील, सतीष भट्टड, डॉ.सुहास शहा व मोनिका शहा, गौरव शहा, कविता कासलीवाल तपासणी करुन उपचार करणार आहे. शिबीराच्या नावनोदणीसाठी महावीर दगडे संतोष गंगवाल,अशोक पापडीवाल, आर.के.काले यांच्याशी संपर्क साधावा.