उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात कार्यरत NMGKS संघटनेच्या माध्यमातून कामगारांची आर्थिक उन्नत्ती केली जाते परंतु कोरोना महामारीच्या काळानंतर सर्वसामान्य नागरिकांचे मानसिक स्वास्थ बिघडलेले जाणवत होते.कामगार नेहमीच कोणत्यातरी तणावाखाली जगताना दिसत होते . याची दाखल ITF या बहुराष्ट्रीय संघाने जागतिक पातळीवर घेवून कामगारांसाठी मानसिक स्वास्थ कार्यक्रम ( Well Being ) राबविला जात आहे. भारतात ते फक्त तीन संघटनांना उपक्रम राबविण्याचा मान मिळाला आहे. त्यामध्ये कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS संघटनेच्या सहकार्याने ITF या लंडन स्थित बहुराष्ट्रीय संघाने NMGKS WELL BEING MENTAL HEALTH PROGRAMME चे काल लाँचींग केले. यामधे उपक्रमाच्या लोगोचे तसेच पोस्टर्सचे लाँचींग करण्यात आले.
समाज मंदिर सभागृह शेलघर येथे पार पडलेल्या या लाँचींग प्रोग्रामसाठी ITF लंडनचे डॉ. असीफ अलताब, कामगार नेते महेंद्र घरत, ITF दिल्लीच्या गीता अय्यर, राजेंद्र गिरी, कॉरपोरेट गेस्ट अंबादास यादव, योगेश ठाकूर, त्याच बरोबर रेल्वे संघटनेच्या सीमी लालसिंग, अनुराधा उरसळ, महाराष्ट्र इंटकच्या महिला अध्यक्षा भाग्यश्री भुर्के, INTUC चे सुनील शिंदे, काँग्रेस नेते मिलिंद पाडगांवकर, मार्तंड नाखवा, संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, जयवंत पाटील, रेखा घरत तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेकडोंच्या संखेने कामगार उपस्थित होते. यावेळी ट्रेनिंग पूर्ण केलेल्या कामगारांना प्रमाणपत्र व लोगो देण्यात आले. अशा प्रकारचे उपक्रम राबविणारी NMGKS संघटना हि एकमेव संघटना आहे.