परिश्रमातूनच ध्येय प्राप्त करता येते : प्रा. डॉ. सुनील कुटे

0

के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न. कोपरगाव : दि.28
“सरावाच्यावेळी सराव आणि अभ्यासाच्यावेळी फक्त अभ्यासच केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत असते. परिश्रमातूनच ध्येय प्राप्त करता येते.” असे प्रतिपादन के. जे. सोमैया महाविद्यालयाचे  शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी येथे केले. स्थानिक के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोनवणे बी. आर. हे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपप्राचार्य म्हणाले की, ” सुसंस्कृत व सुजाण नागरिक घडवण्यात के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा  सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थी अवस्थेत ज्ञान संपादन व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खेळांचे ही जीवनात खूप महत्त्व आहे.  विद्यार्थ्यांनी नेहमी हसत राहावे, खेळत राहावे व आरोग्य संपन्न राहावे.”  असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक व वार्षिक क्रीडा अहवालाचे वाचन जिमखाना समितीचे चेअरमन एस. बी. जगझाप यांनी केले. वार्षिक क्रीडा महोत्सव व वार्षिक क्रीडा स्पर्धांना संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव एड. संजीव कुलकर्णी,  विश्वस्त संदीपदादा रोहमारे व मा. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी बहुमोल शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शाखांमधील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जी. एन. डोंगरे, एस. आर. गायकवाड, जिमखाना समितीचे चेअरमन एस. बी. जगझाप, क्रीडा शिक्षक एम. व्ही. कांबळे व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एम.पी. निळेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार जे. आर. भोंडवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here