कोपरगाव : दि. २८ एप्रिल
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसानिमीत्त कारखाना कार्यस्थळावरील सर्व कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यांत आले. अध्यक्षस्थानी अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग शिवाजीराव संधान होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या यांच्याकडे विशाल दुरदृष्टी असुन त्यांनी उद्योग समुहातील कर्मचा-यांच्या वैयक्तिक सुरक्षेबरोबरच आरोग्यालाही विशेष महत्व दिलेले आहे. दुचाकीस्वारांना त्यांनी यापुर्वीच मोफत हेल्मेटचे वाटप केले. मनुष्याला जन्मजात प्रत्येक अवयव दोन आहेत पण हृदय मात्र एकच आहे तेंव्हा त्याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. डॉ. गणेश ठोमरे व डॉ. योगेश कोठारी यांनी हृदयरोग, रक्तदाब, मधुमेहाबरोबरच अन्य आजारासंबंधी कामगारांना प्रबोधन केले.
अध्यक्षपदावरून बोलतांना पराग संधान म्हणाले की, मनुष्य समाजाचे काहीतरी देणं लागत असतो त्या भावनेतुन कोल्हे कुटूंबियांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातुन प्रत्येक संकटात कोपरगांव विधानसभा मतदार संघातील रहिवासीयांची मदत करण्याचा विडा उचलला आहे, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या माध्यमांतुन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी साखर कारखानदारी आणि त्यावर अवलंबुन असणा-या उद्योग व्यवसायांचा अभ्यास करून बिपीनदादा कोल्हे यांचे मार्गदर्शनातुन ते सतत कार्यरत असतात, समाजाच्या सेवेसाठीच त्यांनी त्यांचा वाढदिवस कारणी लावला आहे.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक मनेष गाडे, सतिष आव्हाड, राजेंद्र कोळपे, बापूराव बारहाते, ज्ञानदेव औताडे, विलास वाबळे, निलेश देवकर, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदिंच्या हस्ते शासनाच्या आयुष्यमान भारत आरोग्य प्रमाणपत्राचे वाटप व कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण आले. डॉ अमोल बानगुडे, रविंद्र माने, वैशाली थोरात यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सुत्रसंचलन कामगार नेते मनोहर शिंदे यांनी केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. बत्रा यांनी आभार मानले. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी वेणूनाथ बोळीज यांनी आभार मानले. कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज बत्रा, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे व त्यांच्या सहका-यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.