मार्च २०२४ एस.एस.सी.विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक , अहमदनगर जिल्ह्यातूनही एस.एस.सी.विद्यार्थ्यांना मोठे बक्षिस

0

सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळीतील एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२४ साठी विद्यार्थ्यांना प्रेरणा म्हणून पारितोषिक जाहीर करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातूनही एस.एस.सी.विद्यार्थ्यांना मोठे बक्षिस मिळाले आहे.
थोर देणगीदार अशोकराव घुले पाटील चिकणी ता.संगमनेर यांच्याकडून त्यांच्या मातोश्री कै.जनाबाई लक्ष्मण घुले यांच्या स्मृति प्रित्यार्थ एस.एस.सी. विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाचे बक्षिस जाहीर केले व त्यांनी ते बक्षिस मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हान केले . ते आव्हान विद्यार्थ्यांनी स्वीकारून ते मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.कुमारी समिक्षा वाजे हिने मी प्रयत्न करून प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवेन असा विश्वास दिला त्यातून प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक व तृतिय क्रमांकासाठी ते बक्षिस देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यालयाची १०० टक्क्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी पाडळी गावचे मा.सरंपच व शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे यांनी खास बक्षिस ठेवले आहे.
या बक्षिसाबद्दल बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देश्मुख यांनी अशोकराव घुले यांचे स्वागत करून सत्कार केला व संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक श्री टी.के.रेवगडे यांनी आभार मानले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम, एस.एम. कोटकर,आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here