उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) : हिंद भारतीय जनरल सेनेचे अध्यक्ष निलेश आप्पा पराडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे सरचिटणीस दत्तात्रय अ. तांडेल यांच्या मार्गदर्शनखाली तसेच संघटनेचे न्यायालयीन कामकाज सचिव प्रदिप कदम यांच्या समपुदेशनाखाली आणि संघटनेचे चिटणीस बाळासाहेब साबळे यांच्या सहकार्याने दिनांक 28/04/2023 रोजी कामगार उप आयुक्त कार्यालय पनवेल येथे सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी यांच्या समक्ष वेतन वाढ करार संपन्न झाला. सदर करार करण्याकरीता स्पीडी मल्टीमोडसचे युनिट अध्यक्ष तुकाराम कडू आणि त्यांचे सह पदाधिकारी अजय ठाकुर,हेमंत घरत, मोरेश्वर घरत,मच्छींद्र कडू, प्रमोद कडू,संजय ठाकुर,जयेंद्र घरत,नारायण तांडेल यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे स्थानिक शिवसेना नेते दिपकजी भोईर यांचेही विषेश सहकार्य लाभले.व्यवस्थापनाच्या वतीने प्रविण पाटिल (एच आर हेड )आणि राकेश कोळी यांनी कामकाज पाहिले.
कराराची प्रमुख वैशिष्ट्ये :-
1)सदर करार रुपये 5000/- आणि कालावधी 3 वर्षाकरीता करण्यात आला
2)अनुकंपातत्व सर्वोच्च न्यायालयाने संपुष्टात आणले असतांना सुध्दा 5 गावच्या कामगारांना त्याच तत्वावर कामावर घेण्यात येईल.
3)उर्वरीत गावाच्या कामगारांना त्यांच्या देय रकमेव्यतिरीक्त 500000/- देण्याचे करारात मान्य केले आहे
4)नविन भरती संदर्भात ही भरघोस पगार वाढ करण्यात आली आहे. हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने स्पीडी मल्टीमोडसचे महासंचालक श्री.पाँल , मुख्य संचालक वेणुगोपाळ,प्रविण पाटिल,राकेश कोळी यांचे विषेश आभार मानण्यात आले. कारण कंपनी आर्थिक दृष्ट्या नुकसानीत आसतांना देखील स्थानिक कामगारांच्या हितासाठी हा करार संपन्न केला.लवकरच कराराची मागील थकबाकी रक्कम कामगारांना अदा करण्यात येईल असे सुध्दा व्यवस्थापणाने जाहिर केले.त्यामुळे कामगारांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.