शासनाच्या गस्ती नौकेवर खराब, फाटक्या व जीर्ण अवस्थेत ध्वज.

0

राष्ट्रध्वजाच्या अपमान केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची मार्तंड नाखवा यांची मागणी.

उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील करंजा बंदर खाडी मध्ये शासनाची गस्ती नौका महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय IND MH3 MM-4266 मत्स्य प्रबोधिनी ही गस्त घालत असता त्याच्यावर जिर्ण अवस्थेत व फाटलेला अवस्थेत असलेला राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे.

त्यातच 27 एप्रिल ते 28 एप्रिल 2023 रोजी सागरी सुरक्षा कवच त्या अभियाना मध्ये देखील ती नौका तशीच फाटक्या झेंड्या सह गस्तीस फिरवण्यात आली.

आचार संहिते नुसार फाटका मळका अथवा जिर्ण अवस्थेत असलेला राष्ट्रध्वज लावणे हा कायद्याने मोठा गुन्हा आहे व पर्यायाने राष्ट्रध्वजाचा व देशाचा अपमान आहे. या करिता त्वरित या बाबतीत चौकशी करून संबंधीत गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी कोकण विभागीय फिशरमेन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालक मंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, तहसीलदार उरण, उरण पोलीस स्टेशन आदी ठिकाणी पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here