अवकाळी पाऊस आणि वादळाने आश्वी परिसराला झोडपले

0

घरावरील पत्रे, भिंती, विजेचे खांब, झाडे उन्ळूमन पडली 

संगमनेर : तालुक्यातील आश्वी व  परिसरातील गावांना शनिवारी दुसऱ्या दिवशी सुद्धा आवकाळी पाऊस आणि वादळाने  झोडपून काढले, रहीमपुर, उंबरी बाळापुर, मांची हिल परिसरात विजेचा कडकडाट आणि गारांसह वादळी वाऱ्याने तांडव नृत्य केले.

       शनिवारच्या या वादळी पावसाचे आलेल्या वाऱ्याने घरांवरील पत्रे,गोठ्याची पत्रे उडुन गेली, भिंती पडल्या तर विजेचे पोल व झाडेही उन्मळून पडली.या पावसाने उंबरी बाळापुर गावातील कारवाडी व चर्च  परीसरातील व आश्वी बुद्रुक, मांची परिसरातील  सोन्याबापु भुसाळ,गोरक्षनाथ भुसाळ,नामदेव शेळके,प्रभाकर शेळके,विश्वनाथ शेळके,प्रकाश शेळके,आप्पासाहेब उंबरकर, गौतम उंबरकर, सूर्यकांत शेळके,संजय उंबरकर, मच्छींद्र कालेकर,सोन्याबापु उंबरकर, योगेश भुसाळ,खंडु होडगर, लक्ष्मण शिंदे ,रत्नाकर शेळके, बाळासाहेब उंबरकर, विकास उंबरकर, सावळेराम भुसाळ,बाळासाहेब भुसाळ,संदिप बर्डे, किरण बर्डे, पुंजा भुसाळ,गोरख कालेकर या शेतकऱ्यांच्या राहात्या घरांवरील,जनावरांचा गोठ्या वरील, पोल्टी फार्म वरील पत्रे उडुन गेली तर काही घरांच्या भिंती पडल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

झालेल्या या नुकसानीची पाहणी डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, आरपीआयचे अशिष शेळके,अशोक उंबरकर, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक डाॅ.संजय कहार,गणेश खेमनर,दिपक शेळके ,कामगार तलाठी कटारे यांनी करत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here