पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालकमंत्री संदीपान पाटील भुमरेंचे निर्विवाद वर्चस्व.

0
फोटो : मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली.(छायाचित्र : गजानन पाटील)

पैठण,दिं.१: पैठण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे रोहयो तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर चे संदीपान पाटील भुमरे यांचे निर्विवाद बहुमत विरोधकांना एकही जागा जिंकता आली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे योग्य नियोजन शिवसेना युवानेते तथा माजी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती विलास पाटील भुमरे यांनी केले होते. 

    पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक जागेसाठी मतदान झाले होते त्याचा निकाल सोमवार रोजी पैठण पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडली.रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे बंधू राजु नाना भुमरे हे ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आले.

   एक दिवसांपूर्वी राज्यातील इतर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकाला मध्ये महाविकास आघाडीने चांगले यश संपादन केल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते आजच्या निकाला मध्ये महाविकास आघाडीला किमान दोन ते तीन जागा मिळतील असा अंदाज राजकीय तंज्ञाचा होता परंतु महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला.

    रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पैठण तालुक्यावर आपलेच वर्चस्व आहे हे या निकालावरून सिध्द केले आहे पुढील पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, खरेदी विक्री संघ या निवडणुका येणाऱ्या काळात होणार असल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निकालामुळे शिवसेना तथा मंत्री संदीपान पाटील भुमरे यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

     पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे राजुनाना भुमरे, सचिन मोगल,राम एरंडे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे,शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे,श्रीमती गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे,श्रीमती मनिषा  खराद, भगवान कारके, महावीर काला, महेश मुंदडा,राजु टेकाळे हे विजयी झाले आहे निवडणूकीचे निवडणूक  अधिकारी म्हणून अनिल पुरी यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे पाटील यांनी सहकार्य केले.

     विजयी निकाल लागताच पंचायत समिती पासून मंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक  काढण्यात आली होती या मिरवणुकीत मंत्री संदीपान पाटील भुमरे, शिवाजी नागरी बैकेचे चेअरमन रविंद्र काळे, महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे पाटील,नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, गणेश मडके, नामदेव खराद,शाम काळे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णाभाऊ लबडे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, गोवर्धन टाक,माजी उपनगराध्यक्ष शहादेव लोहारे, शेखर शिंदे, किशोर दसपुते,दिपक मोरे, योगेश बोबडे, संतोष बोंबले, गणेश बोंबले, अमोल जाधव, किशोर चौधरी, जनार्दन मिटकर, राजु मापारी, अशोक फासाटे, भाऊ लबडे, बबन बोबडे, दादासाहेब गलांडे, दिनेश खंडागळे, नितीन एरंडे,जावेद शेख, विजय जाधव,ज्योती काकडे सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here