बेल्हू फाट्यावरील अपघातात उंबरी बाळापूरच्या आदित्य उंबरकरांचा मृत्यू 

0

संगमनेर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील बेल्हु फाट्यावर सोमवारी रात्री अज्ञात वाहन आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील आदित्य सोमनाथ उंबरकर (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला. 

        याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदित्य सोमनाथ उंबरकर हा उच्च शिक्षित तरुण घोटी येथील रुग्णालयात कार्यरत होता. तो नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घोटीच्या दिशेने चालला होता. यावेळी सिन्नर तालुक्यातील बेल्हू फाट्याजवळ समोरुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने आदित्य उंबरकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत  गंभीर जखमी झालेल्या आदित्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अपघात इतका भिषण होता की, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. काल मंगळवारी सकाळी उंबरी बाळापूर येथे  शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.आदित्यच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी,आजोबा असा मोठा परिवार आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने उंबरी बाळापुर आणि परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here