नगर – राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे सामाजिक कार्यकर्त्यां सि. कॉलेट घोन्साल्वीस यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाला. संस्थेच्या व्यवस्थापिका सि.रिटा लोबो यांनी हा पुरस्कार पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे आदि उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणार्या समाजसेविका व संस्था यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो. सि.कॉलेटर घोन्साल्वीस यांनी लॉरा विकुना निवास कल्याण केंद्र सावेडी, अहमदनगर या संस्थेतच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून गरीब-गरजुंच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन त्या आपली सेवा बजावत आहेत. त्या मुंबई धर्मप्रांतातील सेल्सियन संस्थेच्या सभासद असून, सध्या इटलीतील माल्टा या ठिकाणी सेवा करत आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिस्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिस्टरांनी हा पुरस्कार आपल्या सोबत सेवाकार्य करणार्या सर्व भगिनींना समर्पित केला आहे.