डाॅ. भोईर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबध्दल सत्कार
कोपरगांव: संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटरच्या संहिता विभागाचे प्रमुख डाॅ. कौस्तुभ किरण भोईर (एम.डी.) यांचे आयुर्वेद क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद असुन त्यांची ११६ वर्षांचा प्रदिर्घ इतिहास असलेल्या आखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संचलित महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनच्या अहमदनगर जिल्हाध्यपदी निवड होणे ही बाब त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांच्या निवडीने संजीवनीच्या वैभवात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले.
डाॅ. भोईर यांना नुकतेच आखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे संघटन अध्यक्ष डाॅ. रामदास अव्हाड व महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डाॅ. सतिश भट्टड याचे कडून महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र प्राप्त झाले. याबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी डाॅ. भोईर यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या निवडीबध्दल त्यांचा संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटरच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री सुमित कोल्हे बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. रामेश्वर र पवार, प्रशाकीय अधिकारी एम. डी. भोर, डाॅ. अपश्चिम बरंट, डाॅ. उमा भोईर, डाॅ. भाग्यश्री कोल्हे, डाॅ. भरत कुलथे, आदी उपस्थित होते.
सुमित कोल्हे पुढे म्हणाले की आयुर्वेद हे मुळचे भारतीय विज्ञान असुन या शास्त्राला अतिप्राचिन परंपरा आहे. डाॅ. भोईर यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा संजीवनीच्या नवोदित वैद्यांना फायदा तर होईलच परंतु त्यांच्या तीन वर्षांच्या या आगामी अध्यक्ष पदाच्या काळात आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार होण्यास अधिक गतिमानता मिळेल.
सत्कारास उत्तर देताना डाॅ. भोईर म्हणाले की भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेद संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणीवर अध्यक्षपदी निवड होणे ही बाब मी मागिल १३ वर्षांपासून गोरगरीब रूग्नांवर आयुर्वेदाच्या माध्यमातुन करीत असलेल्या सेवेची फलश्रृती आहे. ‘महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन’ हे नाव प्रथम दर्शनी एखाद्या अधिवेशनाचे आहे की काय, असे वाटते परंतु ही आखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन या राष्ट्रीय संस्थेची राज्यस्तरीय शाखा आहे. या संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे असुन संपुर्ण देशग देशात आयुर्वेदाचे कार्य चालते. मला मिळालेल्या पदाची उंची मी माझ्या कार्यातुन वाढविल तसेच संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्च या संस्थेच्या मदतीने जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहचविण्याचा प्रयत्न करील, असे डाॅ. भोईर म्हणाले.