जामखेड तालुका प्रतिनिधी : – शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जामखेड येथील रत्नदीप मेडिकल कॉलेज चे सर्वेसर्वा डॉ. भास्कर मोरे यांच्यावर एका विद्यार्थीनीने जामखेड पोलीस ठाण्यात केला विनयभंगाचा गुन्हा दाखल.
यातील आरोपीचे असलेले रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय फिर्यादी पिडीता या रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, रत्नापुर,ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे बी.फार्म.सी.प्रथम वर्ग येथे शिक्षण घेत असताना यातील आरोपी भास्करराव मोरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.जामखेड, ता.जामखेड याने फिर्यादीस वेळोवेळी तु खुप सुंदर दिसतेस असे म्हणुन तसेच त्याचे कॅबीनमध्ये बोलावून घेवून तु माझ्यासोबत रीलेशनशीपमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीस ॲटेचेंबरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन छाती दाबून, चुंबण घेण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन डॉ. भास्करराव मोरे याच्या विरूद्ध गु.र.नं. व कलम १८७/२०२३ भादवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०९ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व वरीष्ठांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती साहेब हे करीत आहेत.
ही घटना रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान वेळोवेळी घडली आहे.
रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज येथे यापुर्वी असे व इतर अनेक प्रकार घडले असल्याचे विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले. परंतु,आपले शैक्षणिक करिअर खराब होऊ नये. म्हणून अनेक पिडीत विद्यार्थ्यी फिर्याद देण्यासाठी पुढे आले नाहीत. या प्रकाराने जामखेडच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अजूनही काही विद्यार्थ्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ शकतात.