डॉ. भास्कर मोरे विरूद्ध कडक कारवाईसाठी अभाविपचा अंदोलनाचा इशारा

0

डॉ. भास्कर मोरे यांना अटक करा अन्यथा रत्नदीप मेडीकल कॉलेजवर मोर्चा काढण्याचा विद्यार्थी परिषदेचा इशारा 

जामखेड तालुका प्रतिनिधी :

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यावर दाखल झालेल्या विनभंगाच्या गुन्हातील पिडीत फिर्यादी विरूद्ध खोटा गुन्हा दाखल करू शकतात. डॉ. मोरेंचा सर्व विद्यार्थ्यांवर दबाव असल्याने ते भितीच्या दडपणाखाली आहेत. तसेच सदर मेडिकल कॉलेजमध्ये आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा नाहीत. शिक्षक संख्या पुरेशी नाही अशा अनेक सुविधांचा अभाव व इतरही अनेक बाबींची योग्य चौकशी करावी. तसेच दाखल गंभीर गुन्हयात डॉ. भास्कर मोरेंना दोन दिवसात अटक करावी अन्यथा रत्नदीप मेडिकल कॉलेजवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अहमदनगर जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे रितसर निवेदन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले आहे. 

     ही घटना रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय फिर्यादी पिडीता ही शिक्षण घेत असताना सदर गुन्हातील  आरोपी भास्करराव मोरे याने फिर्यादीस वेळोवेळी तु खुप सुंदर दिसतेस असे म्हणुन तसेच त्याचे कॅबीनमध्ये बोलावून घेवून तु माझ्यासोबत रीलेशनशीपमध्ये रहा असे म्हणून फिर्यादीस ॲटेचेंबरमध्ये घेवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास फिर्यादी यांनी विरोध केल्याने त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन छाती दाबून, चुंबण घेण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन डॉ. भास्करराव मोरे याच्या विरूद्ध गु.र.नं. व कलम १८७/२०२३भादवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०९ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संदर्भात अहमदनगर जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध मागण्या करत अंदोलनाचा दिला आहे. या प्रकरणामुळे संपुर्ण राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ व कारवाईसाठी अनेक पक्षसंघटना अंदोलनाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनावर अहमदनगर जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी प्रशांत किशोर राकेचा, अदित्य संतोष शिंदे, चैतन्य पाटील, ऋषीकेश मोरे आदिंच्या सह्या असून जिल्हा भरातून मोठय़ा संख्येने आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच याच संदर्भातील निवेदने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना देण्यात आल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here