आ. आशुतोष काळेंच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार – संजय शिंदे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू न देता आ. आशुतोष काळे यांनी टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देवून आ. आशुतोष काळे यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करणार असल्याचे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काळे गटाचे नवनिर्वाचित संचालक संजय शिंदे यांनी म्हटले आहे.

काळे गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संजय शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोहेगाव येथील आ. आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार केला यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, मतदार संघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी २००० कोटी निधी आणून विकासाचे मुलभूत प्रश्न सोडवून कोपरगाव मतदार संघात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला देखील आ. आशुतोष काळे यांचा विकास भावला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी यापुढील काळात त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करून त्यांनी केलेली विकासकामे घराघरात पोहोचवण्यासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी संजय शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

चौकट :- आ. आशुतोष काळे यांनी जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच  गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. पोहेगाव परिसरासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळे महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून त्यामुळे मोठी बाजारपेठ असलेल्या पोहेगावला त्याचा मोठा फायदा होत असून आ. आशुतोष काळे यांनी केलेलं काम अजोड आहे. – अशोकराव रोहमारे (अध्यक्ष कोपरगाव तालुका एज्यु.सोसायटी)

यावेळी  एम. टी. रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, माजी संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, पद्मभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, नरहरी रोहमारे, निवृत्ती शिंदे, एकनाथ औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र औताडे, सिताराम वाके, चांगदेव जाधव, कचेश्वर रांधव, मल्हारी देशमुख, महेंद्र रोहमारे, योगेश औताडे, संजय रोहमारे, बाळासाहेब गणपत औताडे, किशोर शिंदे, सुरेश भालेराव, नरहरी वाके, उत्तम भालेराव, मनोहर शेळके, विलास औताडे, भाऊसाहेब सोनवणे, अण्णासाहेब चौधरी, सचिन वाके, बाळासाहेब औताडे, गौरव औताडे, रघुनाथ देवडे, सुरज औताडे, माधवराव औताडे, विलास जाधव, तुकाराम जाधव, लखन औताडे, डॉ. जगदीश झवर, आशिष रोहमारे, वाल्मीक नवले, भाऊसाहेब औताडे, बाळकृष्ण रांधव, विशाल रोहमारे, विजय रोहमारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here