सातारा/अनिल वीर : जय भिम मित्र मंडळ आंबळे,ता.पाटण येथे तथागत गौतम बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीमहाज आदी महापुरुषांची संयुक्त जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली.
प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन समाजात एक वेगळ स्थान निर्माण करुन सामाजिक व धार्मिक कार्यात विशेष सहभाग घेणाऱ्या आदर्श व्यक्तींना सन्मानचिन्ह देवुन गुणगौरव करण्यात आला.यामध्ये युवा नेते राहुल सुदाम रोकडे (अध्यक्ष, तारळे विभाग बौध्द विकास सेवा संस्था), मधुकर जगधनी (तारळे),
भानुदास सावंत (अध्यक्ष, भारतीय बौध्द महासभा, शाखा- तारळे विभाग),निवृत्ती अडसूळेभाऊ (कुशी),विजय राजाराम भंडारे (मरळोशी), राजेंद्र सावंत (निवडे),सुनील माने (जळव), राजाराम भंडारे (ढोरोशी), उत्तम पवार (घोट), सुभाष शिवराम पवार (सेवानिवृत्त PSI आंबळे), राजेंद्र हणमंत लोखंडे (आंबळे), कांबळे सरपंच (मुरुड),धनंजय भीमराव सुर्वे (माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अंबरनाथ शहर – खोजेवाडी), कृष्णात नायकू कांबळे (सेवा निवृत्त API मरळी) आदींचा समावेश होता. त्या सर्वांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
जयभीम मिञ मंडळचे अध्यक्ष विजय सत्वधीर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, खजीनदार जालींदर वाघमारे, संजय सत्वधीर, सुभाष कांबळे, उत्तम पवार, नारायन सत्वधीर, प्रकाश कांबळे,गौतम माने,सोपान गंगावने, सुभाष पवार, गौतम गायकवाड, रामचंद्र गायकवाड, मधुकर गायकवाड, शिवाजी कांबळे, रवी माने, मनोज भंडारे, आप्पासाहेब भंडारे, बाजीराव न्यायनीत,चागदेव घाडगे आदी धम्मबांधव तारळे भागातील ग्रामस्थ बंधु भगिनी बहुसंखेने उपस्थित होते. दरम्यान जळव,बांबवडे,कडवे आदी तारळे भागात संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आहे.