कोपरगावचे तहसीलदार बोरुडे मध्यस्तासह अँटी करप्शनच्या जाळ्यात रंगेहात …

0

कोपरगाव : कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे आपल्या हस्तकासह नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकांच्या जाळ्यात रंगेहाथ पकडल्या गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तहसीलदारासारख्या उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना पकडल्या गेल्यानं लाचखोर अधिकारी – कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील वाळू वाहतूकदाराची वाळू वाहतूक करणारे वाहने तहसीलदारांच्या पथकाने पकडली होती. सदर वाहनांवर कारवाई होऊ नये म्हंणून यातील तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता आरोपी क्र.२ गुरमीत सिंग डडियाल, वय ४० वर्ष. रा. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर याने आरोपी क्र.१ .विजय जबाजी बोरुडे, वय ४४ वर्षे, तहसीलदार कोपरगाव, नेमणूक- तहसीलदार कोपरगाव, रा- शासकीय निवासस्थान कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांच्याकरिता दि.१७/०५/२०२३ दि १९/०५/२०२३ यादरम्यान २०,००० रुपयेची लाचेची मागणी करून नमूद लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. यादरम्यान फिर्यादी यांनी नाशिकच्या लाच प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून वरील प्रकरणी तक्रार दाखल केली होती . तक्रारी प्रमाणे लाच प्रतिबंधक पथकाने सापळा रचला होता. यादरम्यान आरोपी तहसीलदार बोरुडे यांनी नमूद लाचेचे मागणीस प्रोत्साहन दिले असून लाचेची रक्कम २० हजार रुपये आरोपी डडियाल याला १९ मे २०२३ रोजी स्वीकारताना पंच साक्षीदारा समक्ष नाशिकच्या लाच प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले आहे. म्हणून दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमध्ये नाशिकच्या ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र पोलीस अधीक्षक, श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक,नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप साळुंखे, (पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक, वैशाली पाटील (पोलीस उप अधीक्षक) लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पो. ह. पंकज पळशीकर , पो.ना. नितीन कराड, पो.ना. प्रवीण महाजन,पो. ना प्रभाकर गवळी,
चापोना/संतोष गांगुर्डे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्या पथकाने सापळा लावून यशस्वी कारवाई केली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा. असे आवाहन नाशिकच्या लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केले आहे. दूरध्वनी क्रमांक- 02532578230, 02532575628

0

गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यातील बंद असलेली वाळू उपसा व वाहतूक नुकतीच सुरु करण्यात आली आहे. वाळू तस्कर आणि महसूलच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील आर्थिक संबंध हे लपून राहिलेले नाही. गोदावरी नदीच्या वाळू पट्ट्यामध्ये बदली करून घेण्यासाठी महसुलचे अधिकारी जीवापाड प्रयत्न करतात . आणि एकदा का या वाळू पट्ट्यात बदली झाली की सुरु होतो सुरु त्यांचा पैसे वसुलीचा धंदा ! वरील पकडले गेलेले तहसीलदार बोरुडे हेही याला अपवाद ठरले नाही . बोरुडे हे याआधीही आपल्या वर्तनामुळे वादग्रस्त ठरले आहेत. काही दिवसांपुरीच त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिकेच्या विनय भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रकरणी पोलिसांशी गैरवर्तणूक प्रकरणीही तक्रार दाखल करण्यात आली होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here