सावरगाव विद्यालयात शेती कामाची जवाबदारी पेलवत शेतकरी कन्यांची गरुडभरारी!

0

निकाल ९२ टक्के : पायल काटे,आरती काकड प्रथम,नांदूरची अश्विनी सोनवणे द्वितीय क्रमांक

येवला, प्रतिनिधी :

जिद्द,शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते..हे या ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीनी दाखवले आहे.वर्षभर कॉलेज करून रोज शेतीकामात आई-वडिलांना मदतीचा हात देतानाच कधी पायी तर कधी सायकलवर शाळेत येत विद्यार्थिनींनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.विद्यालयात विद्यार्थिनी टॉपर आल्या आहेत.

सकाळी कॉलेज,दुपारी शेतीकामात आई-वडिलांना मदत आणि सायंकाळी पुन्हा स्वयंपाक घराची जबाबदारी…या कामांचे ओझे वर्षभर पेलवूनही शेतकऱ्याच्या लेकींनी मिळवलेले यश कौतुकाचे ठरत आहे.

सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला.अतिशय प्रतिकूलतेवर मात करत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत अभ्यासाची जवाबदारीही निभावत पायल काटे व आरती काकड या दोघींनी ८०.३३ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला क्रमांक पटकावला.प्रतिकूलतेवर मात करत मिळविलेल्या तिच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  वर्षभर नांदूर येथून कधी सायकलवर तर कधी पायी शाळेत येऊन शिक्षनाची आवड जपणारी अश्विनी सोनवणे ७७.३३  टक्के मिळवून द्वितीय तर योगेश वाघ याने ७७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.धामोडा येथील अतिशय गरीब कुटुंबातील दिक्षा कांबळे हिने ७६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली आहे.विशेष म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आई- वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पायल,आरती,अश्विनी,दिक्षा या मुलींनी कधी शेती कामाची तर कधी घरची जबाबदारी स्वीकारत इयत्ता ११ वी पासूनच यशाला गवसणी घालण्याचा चंग बांधला व यश मिळवले आहे.

बारावीचे वर्ष असल्याने आई-वडिलांना मदतीचा हात देत ती घरातील आईच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करायची.शिवाय उरलेल्या वेळात अभ्यास करून हे यश तिने मिळविले आहे.कधी पायी तर कधी शाळेत सायकलवर रोज यायचं..शेतीत व घरात मदत करून अभ्यासाची जवाबदारी पेलवत या मुलींनी हे यश मिळवले आहे.

विद्यालयाचे ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यात ७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील,सहसचिव प्रविणदादा पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना प्राचार्य शरद ढोमसे,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,जेष्ठ शिक्षक गजानन नागरे,वाय.ए.दराडे,पोपट भाटे,वसंत विंचू,उमाकांत आहेर,संतोष विंचू,नामदेव पवार,योगेश भालेराव,कैलास मोरे,योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहीरम,भाग्यश्री सोनवणे,प्रमोद दाणे, उज्वला आहेर,लक्ष्मण माळी,रोहिणी भोरकडे,सगुना काळे,सविता पवार,अर्चना शिंदे,विकास व्यापारे,ऋषिकेश काटे,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,निलेश व्हनमाने,सागर मुंढे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे आदीनी अभिनंदन केले.

“आमची संस्था ५० हून अधिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सक्षम करण्याचे काम करत आहेत.विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती असली तरी अशा स्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य आमच्या शिक्षकांनी जपले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी होतकरू असल्याने त्यांची तयारी करून घेतली जाते.गुणवंत विद्यार्थ्यामूळे विद्यालयाचा नावलौकिक झाला असून यामुळे पालकांचा प्रवेशासाठी विद्यालयाकडे ओढा वाढला आहे.”

प्रमोददादा पाटील,जनरल सेक्रेटरी,शिक्षण प्रसारक मंडळ,नगरसुल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here