घारीत शासन आपल्या दरबारी कार्यक्रम उत्साहात

0

कोपरगाव (वार्ताहर ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस महसुलमंञी राधाकृष्ण विखे यांच्यासंकल्पनेतुन शासन आपल्यादारी कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातील घारी येथे उत्साहात पार पडला .

   यावेळी आरोग्यविभाग, शिक्षण विभाग ,महसुल विभाग ,ग्रामपंचायत विभाग ,पशुवैद्यकियविभाग यांचे स्वतंत्र टेबल लावण्यात आले यावेळी ग्रामस्थ कागदपत्र घेऊन येत होते. 

संजय गांधी श्रावण बाळ कुटुंब अर्थसहाय्य रेशन कार्ड अन्न सुरक्षा दुबाररेशनकार्ड शैक्षणिक दाखले बोनोफाईड ग्रामपंचायत स्तरावरील जन्म मृत्यु विवाह नोंदणी रहिवाशी दाखला संबंधित विभागाच्या आधिका-यांनी दाखल करुन घेतला. तसेच लाभार्थांना माहीती दिली तसेच अपुर्ण आसलेले कागपञ पुर्ण करण्यास सांगितले .

   यावेळी कामगार तलाठी जी एस गरकल ,पशुवैद्यकियविभागाचे डाॕ राहाणे जी एस ,ग्रामविकासआधिकारी जालिंदर पाडेकर, शिक्षणविभाग उपमुख्याध्यापक वाघ एच व्ही, प्राथमिक आरोग्यउपकेंद्राच्या रेणु नागरे ,सरपंच रामदास जाधव, रामकिसन काटकर ,संदिप पवार ,पोलिसपाटील मिराताई रोकडे ,विनोद कुटे, डाॕ गोरक्षनाथ रोकडे, अर्जुन होन, संबधितविभागाचे आरोग्यसेवकआंगणवाडी सेविका आशासेविका शिक्षणविभागाचे कर्मचारी  उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here