अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा ९४.०९ टक्के निकाल

0

नगर – फेब्रुवारी/ मार्च २०२३ मध्ये झालेल्या इ.१२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. यांत अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल ९८.३७%  तर काॅमर्स विभागाचा ९५.२० %  आणि आर्टस विभागाचा ८२.९६ % लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९४.०९ टक्के लागला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सायन्स विभागात कु. अलिझा फारुक सय्यद हिने ६०० पैकी ५३९ गुण मिळवुन  महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर कु. वैष्णवी दिलीप नागपूरे  हिने  ६०० पैकि ५३६ गुण मिळवुन महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकवला. तसेच अर्वा अब्बास सलुजीवाला हिने ६०० पैकी ४९४ गुण मिळवुन महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्टस् विभागात कु. अद्वैता अरविंद सुद्रिक  हिने ६०० पैकी ५२० गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. भुमिका प्रविण घवरी हिने ६०० पैकी ५१८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच चि.अभिषेक राजेंद्र करांदे याने  ६०० पैकी ५०८ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. आणि कॉमर्स विभागात  कु.कृपा किशोर कुलकर्णी हिने ६०० पैकी ५२३ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु.रश्मी राजेश कनोजिया हीने ६०० पैकी ५०० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच कु.सारा ख्वाजा हुसैन शेख हिने ६०० पैकी ४९२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कमलाकर भट, डॉ.बी.एम.गायकर, ज्युनियर काॅलेजचे उपप्राचार्य विनीत गायकवाड उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी शुभेच्छा दिल्या. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here