कोपरगांव दि. ४ जुन २०२३ :
चालू खरीप हंगामासाठी ५६० क्विंटल सोयाबीन तर २०० क्विंटल मका महाबीज व कृभको बियाणे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगाव व ९ शाखेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, सोयाबीन, मका बियाण्याबरोबरच मुग, तुर, उडीद, ताग, धैच्या बियाणे देखील उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सवलतीच्या ‘दरात बियाने योजनेच्या लाभासाठी जवळच्या सेतू कार्यालयात जाऊन शासनाच्या महाडीबीटीवर सातबारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, भ्रमणध्वनीसह ऑनलाईन नोंदणी करावी त्यातू