सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने देण्यात येणारा २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार होळीचागाव ग्रामपंचायतच्यावतीने सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सौ.लीना अविनाश बारसिंग यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी ग्रामविकासाधिकारी सुनील राजगुरू,माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब लादे,सरपंच वंदना शिंदे, उपसरपंच रणजीत शेटे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खाडे, सुनिता चंद्रकांत देशमुख, सुनिता रामचंद्र देशमुख, स्नेहा साठे,उषा जगताप,अण्णा मोरे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.