सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा,खटाव तालुका शाखेच्यावतीने सिद्धेश्वर कुरोली येथे एक दिवशीय समता सैनिक दलाचे शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
“गाव तिथे बौद्धाचार्य व घर तिथे सैनिक” हे समस्त बौद्ध बांधवांच्या सांस्कृतिक आणि संरक्षणाच्यादृष्टीने आवश्यक असून ती काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस अविनाश बारसिंग यांनी केले. शिबिराचे औपचारिक उद्घाटन सातारा पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बबन जगताप होते. एकूण ५३ स्त्री-पुरुष शिबिरार्थीनी शिबिरात सहभाग घेतला. यावेळी संपत भोसले,राजश्री मस्के,माया तडाके,नितीन सावंत,विश्वास जगताप,अधिक कांबळे, सुनील मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.तालुका संरक्षण उपाध्यक्ष कृष्णत केंजळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन अरुण रणदिवे यांनी केले.