नगर – आई-वडिल यांचे पाल्यावर होणारे संस्कार, शाळेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान याची शिदोरी ज्या मुला-मुलींकडे आहे, त्यांना अपयशाची भिती नसते. चांगले करिअर घडविण्यासाठी 10 वी व 12 वी हा पाया असतो. पालक-शिक्षक यांच्या समन्वयाने व विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश संस्थेचे भुषण आहे. विद्यार्थ्यांनी पालक-शिक्षक यांच्या अपेक्षांची पुर्तता करावी, असे प्रतिपादन सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रा.दादासाहेब भोईटे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव रामकिसन देशमुख, प्राचार्य भरत बिडवे, मुख्याध्यापिका सौ.अनिता सिद्दम, प्रा.ए.जी.शिंदे, प्रा.लक्ष्मण बेळगे, प्रा.राहुल जाधव, प्रा.भारती थोरवे, प्रा.सुनिता त्र्यंबके, प्रा.पुनम खडके, प्रा.क्रांती घोडके, प्रा.संध्या यादव, प्रा.विष्णू मगर, प्रा.मंगल कदम, पालक उपस्थित होते.
प्रा.भाईटे म्हणाले, संस्थेने तळागाळातील, गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा संकल्प संस्थापक स्व.डॉ.ना.ज.पाउलबुधे यांनी केला होतो, तो आज पुर्ण होत असल्याचे समाधान वाटते. संस्थेचे सचिव रामकिसन देशमुख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना भविष्यात कोणतेही क्षेत्र निवडा पण अंर्तमनातून त्या क्षेत्राशी प्रामाणिक राहून अभ्यास करा, यश हे निश्चित मिळते.
प्रास्तविकात प्राचार्य भरत बिडवे सर यांनी संस्था उभारणीपासून ते आज पर्यंतचा खडतर प्रवासाचे वर्णन करतांना स्व.डॉ.पाउलबुधे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळा, संस्था, विद्यार्थी माझे आहेत हे समजून काम केले. या यशाचे शिल्पकार आपण सर्व आहोत, असे सांगितले.
याप्रसंगी 10 वी मधील 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेले विराज खरात, श्रावणी रासकर, वैष्णवी इंगळे, शितल मिसाळ, वैष्णवी दहिफळे, स्पंदन गावडे यांचा तर 12 वीमध्ये विद्यालयात प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले कला शाखेतील ऋतुजा सुरम, सुनाक्षी शिंदे, राधिका टाके, तर विज्ञान शाखेतील साक्षी नागरगोजे, सार्थक ठिपसे, दुर्वेश चोथे आदिंचा सत्कार करण्यात आला.
पालकांच्यावतीने रोहिणी इंगळे, सुशिल ठिपसे, शामुवेल खरात यांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आदिंचे विद्यार्थ्यांकडे लक्ष असते, त्यामुळेच शाळेचा निकाल 100 टक्के लागतो. प्राचार्य बिडवे यांनी सेवानिवृत्तीनंतर देखील शाळेकडे लक्ष द्यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन दिपक परदेशी यांनी केले तर राजेंद्र मोरे यांनी आभार मानले.