सातारा : महाबळेश्वर तालुका विकास मंडळ, मुंबई संचालित शिरवली,ता.महाबळेश्वर येथील विद्या विकास हायस्कूलने एस. एस.सी.परीक्षेत १०० टक्के एवढा निकाल लागलेला आहे. प्रथम क्रमांक कु. रिंगे रसिका लक्ष्मण हिने 81.80 टक्के गुण मिळविले. शिंदे गौरव मिलिंद याने 73.40 टक्के मिळवून व्दितीय तर जंगम शुभम हरिभाऊ याने 72.80 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने यश संपादन केले.याबद्धल मुख्याध्यापक पंढरीनाथ खाडे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारिवृंद, संस्था,पालक व शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले.