कर्जत तालुक्यातील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास तातडीने लावा – माजी मंत्री बबनराव घोलप

0
फोटो - कर्जत तालुक्यातील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास तातडीने लावावा, या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी महासंघाच्या शिष्टमंडळासह पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेतली.

पोलीस यंत्रणा प्रामाणिक आणि सक्षमपणे प्रयत्नशील असून लवकरच प्रकरणाचा छडा लावू : पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाला आश्वासन

     नगर – कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला दि 22 मे रोजी पळवून नेण्यात आले असून, पोलिसांना आरोपी व त्याचा साथीदार याची नावे सांगूनही पोलीस तपासात दिरंगाई होत आहे. अद्यापावेतो मुलीचा आणि आरोपीचा तपास लागला नसल्याने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी महासंघाच्या शिष्टमंडळासह आज पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, पोलीस प्रशासन सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे तपास करीत असून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावू, असे आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिले बबनराव घोलप यांना दिले.

     या शिष्टमंडळामध्ये महासचिव दत्तात्रय गोतिसे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, राज्य सदस्या शोभाताई कानडे, लताताई नेटके, अरुणाताई गोयल, भाऊसाहेब पवार, रघुनाथ आंबेडकर, ज्ञानेश्वर म्हैसमाळे, संदीप आमटे, महेश आहेर, विक्की गारदे, अभिनव सुर्यवंशी, खेमराज बुंदेले, दीपक पाचारणे, लक्ष्मण साळे, संतोष त्रिंबके, सचिन वाघमारे, रमेश सोनवणे, विद्याताई कसाब, प्रकाश जाट, शिवसेनेचे शिरीष जाधव, गौरव ढोणे, अंबादास शिंदे, अशोक पारधे, आदी उपस्थित होते.

     मुलीचा तपासात पोलिस दिरंगाई करता असल्याचे निषेधार्थ मुलीच्या आई-वडिल व बंधूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 2 मे पासून आमरण उपोषण सुरु केले होते. या दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने निवेदने देण्यात आली होती. उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची परिस्थिती खालावत चालली असल्याने 5 जून रोजी शहर शिवसेना आणि शहर भाजपच्या वतीने तसेच सकल हिंदू समाज संघटनांचे वतीने रास्ता रोको करण्यात आले होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले होते.

     परंतु अद्यापही तपास लागत नाही, या पार्श्वभुमीवर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज पोलिस अधिक्षकांची भेट घेत मुलीचा तपास तातडी लावावा, अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here