सातारा : दलित अत्याचारास एकच जबाब उठ दलिता तोफा डाग….हर जोर जुलम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है । एक दिवस समाजासाठी एक दिवस बाबासाहेबाच्या लेकरासाठी स्मृतीशेष भीमयोध्दा अक्षय भालेराव यांच्या एक दिवस न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचिततर्फे आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले.
नांदेड येथे बोंडार गावी दलित समाजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने सवर्ण समाजातील जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी.या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रस्थापित शासन व प्रशासन यांच्या निष्क्रिय कारभारा विरोधात तीव्र स्वरूपाचे निदर्शन – आंदोलनावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रारंभी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तालुकाध्यक्ष आप्पा तुपे,सातारा टाइम्सचे संपादक सत्यनारायण शेडगे, प्रतिनिधी तथा राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे संस्थापक अनिल वीर,ऍड.दयानंद माने,प्रमोद क्षीरसागर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष देसाई यांच्यासह महासचिव गणेश भिसे,सागर गाडे,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड, जावली तालुक्यातून प्रताप सकपाळ, योगेश कांबळे व किरण गायकवाड,महाबळेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव आदी जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.दिवसभर आंदोलन स्थळी वंचितसह इतर संघटनेच्या पदाधिकारी व प्रतिनिधींनी भेटी देऊन पाठींबा दिलेला आढळून आला.प्रामुख्याने,आंदोलनास जिल्ह्यातील सर्व विंगचे जनरल, महिला, कामगार,युवक आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील आंबेडकरी,मानवतावादी,समतावादी स्त्री – पुरुष जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती.