उरण विधानसभा मतदारसंघात भा ज प ला खिंडार – शिवसेनेत मोठे इन कमिंग.

0

पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : बुधवार दिनाकं 12 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत  उरण विधानसभा मतदारसंघात पनवेल तालुक्यातील भोकरपाडा, पोयांजे व कोन विभागातील  भाजप च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख  बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्रीवर झालेल्या या प्रवेशात सतिश अगिवले, लक्ष्मण पाटील, अरविंद शिंदे, उमेश शिंदे, मयुर पाटील, धीरज पाटील, रघुनाथ पाटील, हेमंत पाटील, हेमंत शिंदे, अनिल मोरे, विनोद शिंदे, हेमंत पी.पाटील, सागर अगिवले,संतोष अगिवले, संतोष पाटील, संतोष सी. पाटील, महेश पाटील,दिपक पाटील, आदेश पाटील,रोहित पाटील, पवन पाटील, साहिल पाटील,प्रतिक पाटील, अनंत ससे, सुशांत मालकर, रोशन म्हात्रे व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख  नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख  महादेव घरत, विधानसभा संघटक  देविदास पाटील, उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख  रघुनाथ पाटील,  तालुका संघटक  बी एन डाकी,  गटनेते गणेश शिंदे, तालुका संपर्कप्रमुख  अनंत पाटील व उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवसेना पदाधिकारी  व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here