कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ असावा –  आमदार जयंत भाई पाटील 

0

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्याला खरी नेतृत्वाची गरज आहे.आज शेकापच्या तालुका चिटणीस पदी सर्वानुमते विकास नाईक यांची निवड ही शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊ करण्यात येत आहे.शेकापक्षाने अनेकांना मोठे केले.परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत.कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ पाहिजे.वाजेकरशेठ ची ही भूमी आहे.या तालुक्यातील शेकापक्षाचे आमदार हे उरणची शान होती.त्यामुळे या तालुक्याचे नेतृत्व हे पुन्हा शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून विकास नाईक च्या रुपाने करणार आहे.असे प्रतिपादन आमदार जयंत भाई पाटील यांनी व्यक्त केले.

    उरण तालुक्यातील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी उरण जेएनपीए टाऊनशिप येथील मल्टीप्लेक्स हाँल मध्ये शुक्रवारी ( दि१४) सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेकापच्या उरण  तालुका चिटणीस पदी विकास नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला संबोधित करताना आमदार जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की ही सभा तालुका चिटणीस निवडण्याची आहे.आपल्याला प्रभारी कामगार संघटना निवडण्याची गरज आहे.आज जे कामगारांचे नेतृत्व करतात ते भांडवलदारांचे मींदे होतात. या तालुक्यात शेकापक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागळात काम केले पाहिजे.आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आश्वासन देण्याचे काम केले.परंतु येथील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम शेकाप करत असून यापुढे ही करणार आहे,आज वायु विद्युत केंद्र उरण येथील दुर्घटनेतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उरणचे आमदार जात नाहीत हे दुर्दैव आहे.

  पण या कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप कटिबद्ध असून या संदर्भात विधिमंडळात आवाज उठविणार आहे.तरी शेकापचा तरुण कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जात असेल तर ते योग्य नाही.त्यासाठी प्रथमतः प्रत्येकांनी तरुणांना सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. शेकापक्षाचे आमदार हे उरणची शान होती.त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या तालुक्यात भांडत न बसता उरणच्या जनतेचा आदर करा कारण आज ही उरण आपलंच आहे.त्यामुळे उरणच वैभव पुन्हा फुलविण्यासाठी व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करा.असे आवाहन ही शेवटी आमदार जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

उरण तालुका हा वाजेकर शेठ यांचा लढवय्यांचा तालुका आहे. लोकनेते दि.बा.पाटलांच्या नेतृत्वा खाली अनेक लढे उभारले अशा लढ्याला खरी साथ ही शेकापक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी दिली.आज वायु विद्युत केंद्रात दुदैवी घटना घडली त्या घटनेतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उरणचे आमदार आले नाहीत.पण कामगार नेते भुषण पाटील व त्यांचे सहकारी आले.येथील प्रकल्पग्रस्त, शेतकरी यांना रोजगार देण्याचे काम शेकापक्षाने केले.तरी एकमेकांची उणी धुणी न काढता भविष्यात या परिसरातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा एकसंघ होऊ या,त्याची सुरुवात ही उरण तालुक्यात नव्याने उदयास येत असलेल्या शेकापक्षाच्या कार्यालयातून करु या असे आवाहन शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी केले.

  यावेळी शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील ( पप्पू शेठ), पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम दादा म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सीमा अनंत घरत, पनवेल तालुका चिटणीस, नगरसेवक गणेश कडू, सरपंच सुभाष भोईर, महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ अध्यक्ष नामदेवशेठ फडके,शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील,माजी सभापती नरेश घरत,शेखर शेलके,माजी सभापती समिधा म्हात्रे,शेकाप गव्हाण विभाग अध्यक्ष मधुकर शेठ पाटील,माजी उपसभापती शुभांगी पाटील,तालूका चिटणीस मेघनाथ तांडेल, राजेश केणी, सरपंच संतोष घरत, सरपंच रंजना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील,जीवन गावंड, सुरेश पाटील, नरेंद्र मुंबईकर,माजी उपसभापती महादेव बंडा, उरण तालुका युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे,नैना कमिटी अध्यक्ष वामन शेलके,प्रभाकर पाटील,भारतराज थळी,माजी सरपंच मधुकर शेठ पाटील, रमाकांत पाटील, नामदेव शेठ मुंबईकर, माजी चिटणीस यशवंत पाटील  सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकापचे युवा तालूका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सीमा घरत, सुरेश पाटील, पनवेल तालुका चिटणीस गणेश कडू यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.उरण तालुका शेकाप चिटणीस पदी विकास नाईक यांची निवड होताच उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच मावळते चिटणीस मेघनाथ तांडेल यांच्यावर पक्ष संघटना वेगळी जबाबदारी सोपविणार असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here