वय हे अनुभव व उत्साहासमोर तोकडे असतात

0

सातारा : वय म्हणजे बोलणारे आकडे असतात. अनुभव  अन् उत्साहासमोर ते तोकडे असतात. असं हे उत्साही दमदार अन् तडफदार अन् अनुभव संपन्न पाटण तालुक्याचे कर्तृत्व संपन्न नेतृत्व म्हणजे भीमराव दाभाडे होय.

         पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघाचे अध्यक्ष भीमराव घोरपडे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे, प्रा.रवींद्र सोनवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते. तेव्हा दाभाडेसाहेबाबद्धल  अभिष्टचिंतनपर अनेकांनी गुणगौरवपर गौरवोद्गार काढले. सामाजिक,राजकीय,धार्मिक आदी क्षेत्रात मुशाफिरी करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.सढळ हस्ते मदत करणारे अर्थात दातृत्वाचा अन् कर्तृत्वाचा अनोखा संगम याचं दुसरं नाव म्हणजे भिमराव दाभाडे.आजच्या सुदिनक्षणी अन् जन्मदिनी.दिने दिने प्रतिदिनी. दिसामासानं. आपलं जीवनमान खुलावं अन् फुलावं. उदंड आयुर्मान अन् दिगंत किर्तीमान व्हावं. गतवर्षी तर भीमराव दाभाडेसाहेब यांनी पुढाकार घेऊन अनिल वीर यांचा वाढदिवस साजरा केला होता.

                 भिमराव दाभाडे यांनी यावर्षी अनिल वीर यांच्या वाढदिवसानिमित्त व मंगल परिणयदिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा पुढीप्रमाणे आहेत. “फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे अग्रेसर असणारे गाव म्हणजे त्रिपूडी. गावचे परिवर्तन विचारांचे पाईक आदरणीय अनिल वीर. जिल्ह्यातील लोकप्रिय पत्रकार अशी ख्याती असलेले समाजातील प्रामाणिक, सुज्ञ व बुद्धिजीवी अनुयायांची जबाबदारी असणारे बुद्ध, कबीर, फुले व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या शस्त्रगारातील समता, स्वातंत्र्य, बंधूभाव, नम्रता  व सदाचार हे विचार घेऊन प्रत्येक माणसात प्रबोधन झाले पाहिजे, प्रत्येक माणसाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून आपल्या पत्रकारिता या माध्यमातून आंबेडकरी अनुयायांनी म्हणून विना मुल्य समाज सेवा करणारे एकमेव पत्रकार, एखाद्या व्यक्तीचा जीवन संघर्ष कसा प्रेरक असू शकतो? यांचे आदर्श उदाहरण म्हणजेच  अनिल वीर.कौतुक करणे समाजाचे कर्तव्य आहे.समाज म्हणून आपण त्यांना काय देऊ शकतो ॽ तर , त्यांच्या एकूणच कार्याबद्दल आपण दोन चांगले शब्द बोलू शकतो,लिहू शकतो. वीरसर म्हणजे एक वक्ता, प्रबोधनकार, मार्गदर्शक आणि समाजसेवक अशा विविधांगी पैलूंनी संपन्न सरांचे जीवन म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. आदर्श व्यक्तिमत्व असणारे दाम्पत्य.मोठ्या चळवळीची जीवनी सुगंध असा दरवळला या पवित्र कार्याच्या.अशीच क्रांती घडत राहो ! घडो सेवा समाजाची उदंड आयुष्य लाभो आपणाला….”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here