बृजभूषण यांच्याविरोधातील पॉक्सोचा गुन्हा रद्द करण्याची दिल्ली पोलिसांची कोर्टात मागणी

0

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी 15 जून रोजी राऊस एव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यावर आता 22 जूनरोजी सुनावणी होणार आहे.

15 जूनपर्यंत बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होईल, असं आश्वासन केंद्र सरकारनं कुस्तीपटूंना दिलं होतं. आज 15 जून म्हणजेच शेवटच्या दिवशी सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक पॉक्सो कायद्यांंतर्गत नोंद करण्यात आली होती. मात्र पॉक्सो प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी कॅन्सलेशन रिपोर्ट म्हणजेच आरोप रद्द करण्याची मागणी करताना दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांना दिलासा दिला आहे.

सिंह यांच्यावर अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला. अल्पवयीन कुस्तीपटूच्या कुटुंबीयांनी त्यांचा खटला मागे घेतला होता, मात्र इतर कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंगच्या अटकेवर ठाम आहेत.

दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, कुस्तीपटूंच्या वतीने दाखल केलेल्या एफआयआरची तपासणी केल्यानंतर बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात आयपीसी कलम 354 354 ए, 354 डी, 506 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here