*काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून संपन्न

0

येवला प्रतिनिधी :

 येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे वाढदिवसानिमित्त कालिका प्राथमिक विद्या मंदिर, येवला येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, पेन्सिल, शाॅपनर, खोडरबर ईत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. 

  यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, निराधार व निराश्रित काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष सुरेश गोंधळी, शहर कार्याध्यक्ष व प्रवक्ते नानासाहेब शिंदे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, उमेश कंदलकर, बोकटे गावचे सरपंच प्रताप दाभाडे, तालुका कार्याध्यक्ष भाऊराव दाभाडे, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, दिपक साळवे, मुख्याध्यापक सौ. जयश्री ठाकूर, शिक्षक महेश आहेर सर, शिक्षिका सौ. रंजना आहेर ,अण्णासाहेब शिंदे, अशोक नागपुरे, अतुल पोफळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here