कोपरगाव प्रतिनिधी – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नेहमीच समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नतीसाठी अहोरात्र आपल्या समता परिषदेच्या माध्यमातून कार्य करत असतात तसेच तळागाळातील काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचा विचार करत, त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांचा योग्य तो सन्मान करत त्यांचा न्याय हक्कांसाठी प्रयत्नशील असतात. तसेच लोकशाही मधील महत्वाचा घटक असल्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आजही शासनदरबारी प्रलंबित असुन हे सर्व प्रश्न समता परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकारणी सदस्य माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी व्यक्त केले.
बहुजनांचा, बहुगूंणाचा नेता म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जाणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा अमृतमहोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने तसेच भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेल्या वृत्तपञ विक्रेता दिनाचे औचित्य साधत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांची दखल घेवुन कोपरगांवच्या इतिहासात प्रथमच वृत्तपञ विक्रेत्यांचा विशेष सन्मान पद्माकांत कुदळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांना उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकारणी सदस्य माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या ताराबाई पवार, वृत्तपत्र संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब आहेर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापु वढणे, दै. लोकमंथनचे प्रतिनिधी विजय कापसे आदि प्रमुख मान्यवर उपस्थितीत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकांत कुदळे बोलतांना म्हणाले की, माजी राष्ट्रपती डाॕ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांचे भारताच्या जडणघडणीत व राज्याच्या जडणघडणीत माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांचे मोठे योगदान असुन या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येणे यास दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून वृत्तपत्र नित्यनियमाने भल्या पहाटे घरोघरी पोहच करणारे वृत्तपत्र विक्रेते यांचे कार्य महान असून आजच्या सोशल मीडिया च्या युगात देखील वृत्तपत्र आपले स्थान टिकून आहेच परंतु येणाऱ्या काळात देखील जगाची खबरबात प्रसिद्ध करणारे वृत्तपत्र हेच प्रभावी माध्यम असणार असल्याचे प्रतिपादन शेवटी कुदळे यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ विक्रेते माणिक उगले, अविनाश पाटील , बाळासाहेब आहेर, विजय कापसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगावच्या जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या ताराबाई पवार यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करत भुजबळ साहेबांना सर्व उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी औकांर वढणे , ओम वढणे आदि उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मनीष जाधव यांनी केले तर उपस्थिताचे आभार संघटनेचे सचिव महेंद्र टोरपे यांनी व्यक्त केले.
*चौकट -*
*वृत्तपञ विक्रेतांना समता परिषदेचे पाठबळ*
दिवसेंदिवस वृत्तपञ विक्रेत्यांचे समस्या वाढत आहे. शासनदरबारी अनेक प्रश्न प्रलंबित असुन ते सोडविण्यासाठी समता परिषदेने घेतलेला पुढाकारामुळे प्रत्येक वृत्तपञ विक्रेत्यांना मोठे पाठबळ मिळणार आहे तसेच अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त व राज्याचे माजी उपमुख्यमंञी छगनरावजी भुजबळ साहेबांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने कोपरगांवच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या सन्मानात वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला असुन तो दिवस अविस्मरणीय राहील.
– बाळासाहेब आहेर , अध्यक्ष कोपरगांव तालुका विक्रेता संघ