परीपाठ
सौ . सविता देशमुख उपरिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी
9511769689
❂दिनांक :~ 30 जून 2023 ❂
_*❂ *वार ~ शुक्रवार*
*_आजचे पंचाग*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ. 30 जून
तिथी : शु. द्वादशी (शुक्र)
नक्षत्र : विशाखा,
योग :- साध्य
करण : बव
सूर्योदय : 05:50, सूर्यास्त : 07:09,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡सर्वात शक्तिशाली दोनच योद्धे आहेत – संयम आणि वेळ..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌अंथरूण पाहून पाय पसरावे
🔍अर्थ:-
आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌞या वर्षातील🌞 181 वा दिवस आहे.
_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_
👉१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
👉१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
👉१९४४: मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्का बसला.
👉१९६५: भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
👉१९६६: कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
👉१९९७: ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
👉२०००: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बील क्लिंटन(Bill Clinton) यांनी अमेरिकेत डीजीटल हस्ताक्षर करण्यास वैध रित्या परवानगी दिली.
👉२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
_*💐जन्मदिवस / जयंती💐*_
👉१९०३: भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्षाचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचा जन्मदिन.
👉 १९११: साहित्य अकादमी चे फेलोशिप प्राप्त भारतीय साहित्यकार नागार्जुन यांचा जन्मदिन.
👉१९२८: कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)
👉१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.
👉१९४३: सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक
👉१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.
👉१९६६: माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
👉१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
_*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_
👉१८५७: शाही डोगरा राजवंशाचे संस्थापक आणि जम्मू-काश्मीर राज्याचे पहिले महाराजा तसचं, ब्रिटीश भारतातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे रियासतदार महाराजा गुलाबसिंह जामवाल यांचे निधन.
👉१९१७: पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
👉१९१९: नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विलियम्स स्ट्रट रेले(John William Strutt) यांचे निधन.
👉१९९४: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)
👉१९९७: राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक, यांनी २५ वर्षे कै. राम मराठे यांच्याबरोबर संगीत सौभद्र नाटकात श्रीकृष्णाची भूमिका केली होती.
👉१९९९: कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी (जन्म: ? ? ????)
👉२००८: भारतीय पंजाब राज्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक आणि राजकारणी केवल कृष्ण यांचे निधन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉भारुड रचना ही कोणत्या संताने केली आहे?
🥇संत एकनाथ
👉मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली?
🥇पुणे
👉महाराष्ट्र कृषी दिवस कधी साजरा केला जातो ?
🥇01 जुलै
👉बेडूक हा उभयचर प्राणी पाण्यात असताना कशाच्या साहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन शरीरात शोषून घेतो ?
🥇त्वचा
👉फिरोजशहा कोटला मैदान हे देशातील कोणत्या शहरात आहे ?
🥇दिल्ली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻
👥दोन मित्र🤝
दोन मित्र होते. एक फारच धार्मिक वृत्तीचा होता. तो नेहमी देवपूजा, जप यात मग्न असायचा तर दुसरा त्याचे विरूद्ध टोक होता. तो कधीच मंदिरात जात नसे, घरीही पूजाअर्चा करत नसे. दान-पुण्यपाप यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याने जीवनात अधिक पैसे मिळविण्याचे ठरविले होते. तो रात्रंदिवस पैसे कमावण्यात गुंग झाला होता. भौतिक सुविधांनी त्याने आपले जीवन संपन्न बनविले होते. पण त्याच्या जीवनात सुख व संतोष हे नावाला सुद्धा नव्हते. याउलट आस्तिक मित्र आपल्या गरीबीतच सुखी,समाधानी होता. तो तुटपुंज्या साधनातच समाधानी राहत असे. नेहमी ईश्र्वरभक्तीत रममाण होता. एके दिवशी नास्तिक मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला व त्याचे साधे घर पाहून तो म्हणाला,”तुझ्या त्यागाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. तू तर ईश्र्वरभक्तीमध्ये सा-या जगाला सोडून दिलेस मात्र तरीही खुश आहेस” हे ऐकून आस्तिक मित्र म्हणाला,”मित्रा, मी आपल्या गरीबीत फार आनंदी आहे, पण तुझा त्याग तर माझ्यापेक्षाही मोठा आहे कारण तू तर पैशासाठी, सुखसोयीसाठी ईश्र्वरालाच त्यागले आहेस, तूच सांग तू खुश आहेस ना” आपल्या मित्राचे हे बोलणे नास्तिक मित्राच्या जिव्हारी लागले. त्याने विचार केला की आपण हे सर्व धन मिळवतो पण आपल्याला सुख का लागत नाहीये, समाधान का मिळत नाही. पण गरीब असणारा आस्तिक मित्र मात्र सुखात आहे, आनंदात आहे याचे कारण त्याला कळाले. त्या दिवसापासून त्याच्या जीवनाची दिशाच बदलून गेली.
🧠तात्पर्य :-
जीवनात अनेक गोष्टी अनुकूल प्रतिकूल बनविणारी कोणती तरी सत्ता ही मानवाला मानवावीच लागते .त्याची आठवनसुद्धा कांही वेळा मनाला सूचक आशा सूचना देऊन आपले वर्तन बदलण्यास मदत करते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर.
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸