पैका पैका जमवून
करी पोळ्याचा सण
लेकरे मानतो बैलां
जपतोयं माणूसपण
नव्ह्ते ट्रॅक्टर ट्रेलर
कुठली मशीनी पण
आधार सर्जाराजाचा
असंख्य त्यांचे ऋण
डोक्यावर कर्जओझे
पैशांची नीतचणचण
साथ न सोडलीकधी
फिरत राही वण वण
अर्धपोट कधीउपाशी
राबले तेही क्षणोक्षण
कसे विसरावे सांगा
उपकार त्या मणमण
आता ही माॅडर्न शेती
रे सुखात सगळेजण
नातवां वाटू लागली
बैलजोडीची अडचण
विकावी बैल नि गाडी
चाले मागे भुण भुण
अरे कसले कृतघ्नपण
कुठूनि आले अवगुण
उपरती व्हावी त्यांना
कृतज्ञतेचे हो स्मरण
उगवावा असा दिवस
तोचि पोळ्याचा सण