सातारा/अनिल वीर : “खाशाबा” या चित्रपटासाठी प्रेरणा स्त्रोत ऑडीशनसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कृष्णाकाठचे नामांकित जागतिक कीर्तीचे आणि भारतासाठी पहिले ऑलंपिक पदक जिंकणारे पैलवान खशाबा जाधव यांच्या जीवनावर जीवनपट,”खाशाबा” ही यशोगाथा रुपेरी पडद्यावर येत आहे.
ग्रामीण भागातील मुलांनी आत्मविश्वासाने अनेक क्षेत्रे काबीज केली. त्यांचे खाशाबा जाधव प्रेरणा स्त्रोत राहिले आहेत.नागराज मंजुळे सारखे समाजभान असणारे दिग्दर्शक कलावंत आता या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. ही खूप मोलाची आणि महत्व पूर्ण बाब आहे.भारतील क्रीडा क्षेत्रासाठी दिशा दर्शक काम करणाऱ्या ऑलिंपिक वीर पै. खाशाबा जाधव यांच्याविषयी नेहमीच कुतूहल वाटत आले आहे.अशी माहिती चंद्रकांत कांबिरे यांनी दिली आहे.तेव्हा चित्रपटासाठी ऑडिशन फक्त मुलांसाठी आहे.माती व मॅटवर कुस्ती येणे गरजेचे आहे.५ फोटोपैकी ३ फोटो शरीरयष्टी दाखवणारे असावेत. ७ ते २५ या वयोगटातील सेकंदाचा फोटो कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ पाठवावा.शिवाय,३० सेकंदाचा स्वत:ची माहिती सांगणारा व्हिडिओ पाठवावा.https://forms.gle/yux23uhji4opzl4w9 या लिंकवर फॉर्म भरावा.अधिक माहितीसाठी ९३५६७१७७०९ या भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.