जिल्हा वाचनालयाच्यावतीने निंबध स्पर्धेचे आयोजन

0

नगर – अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने दि.1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय गट व  महाविद्यालयीन आणि खुला गटासाठी निंबध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती वाचनालयाच्यावतीने देण्यात आली.

     निबंध स्पर्धेसाठी शालेय गट (लहान गट) इ 7 वी ते 10 वी : विषय – लोकमान्य टिळक- सण आणि उत्सव, मी कलेक्टर झाले/झालो तर, माझे शिबीर माझा अनुभव, शाळेचे आत्मचरित्र- मी शाळा बोलतेय. खुला गट (सर्वांसाठी) : विषय – अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा, लोकमान्य टिळक आणि भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे, माझे पर्यटन – एक सुखद अनुभव, सोशल मिडियाच्या युगात वाचनालयांची गरज.

     निबंध कागदाच्या एका बाजूस स्वत:च्या सुवाच्च हस्ताक्षरात आसावा. शालेय गटासाठी 700 शब्दांपर्यंत मर्यादा तर खुल्या गटाचे निबंध 1500 ते 2000 शब्दांपर्यंत असावेत. निबंध 31 जुलै 2023 पर्यंत जिल्हा वाचनालयात आणून द्यावेत. प्रवेश शुल्क प्रत्येकी 10 रु. आहे.  निबंधासोबत नाव व पूर्ण पत्यांची, मोबाईल नंबरची स्वतंत्र चिठ्ठी जोडावी. परितोषिक वितरण लवकरच करण्यात येईल.

     स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष अनंत देसाई, दिलीप पांढरे, खजिनदार तन्वीर खान, सहकार्यवाह डॉ.राजा ठाकूर, संयोजक किरण आगरवाल, शिल्पा रसाळ व सर्व संचालक, ग्रंथपाल अमोल इथापे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here