प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस याचा ह्युम मेमोरियल चर्च कमिटीच्यावतीने सत्कार
नगर – अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांना आंतरराष्ट्रीय स्टार आयकॉन पुरस्कार मिळल्याबद्दल ऐतिहासिक ह्युम मेमोरियल चर्च कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेव्ह.पी.जी.मकासरे, डॉ.जॉन उजागरे, रेव्ह.विद्यासागर भोसले, सेक्रटरी जॉन्सन शेक्शपीअर आदिंसह उपप्राचार्य डॉ.सय्यद रज्जाक, डॉ.भालसिंग आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपीयर म्हणाले, अहमदनगर महाविद्यालय हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असून, शैक्षणिकदृष्टया जिल्ह्याला दिशा देण्याचे महत्व कार्य या महाविद्यालयाने केले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात महाविद्यालयाचे आपला शैक्षणिक दर्जा सांभाळलेला आहे. त्यामुळेच देशातील विविध प्रांतातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांना सर्वोतोपरि सुविधा देत त्यांची प्रगती साधत आहे. यात प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्वाने महाविद्यालयाच्या लौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यांच्या कार्याची दाखल घेत त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान मिळत आहे, ही नगरकरांच्यादृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
यावेळी चर्च कमिटीचे सदस्य फ्रॅक्लिन शेक्सपीयर, ऑल्विन शेक्सपीयर, मिलन कदम, एन.बी.जाधव, वसंत कांबळे, सुधीर शिंदे, निशा कदम, शामराव भिंगारदिवे, संदिप पारधे, रोहन भोसले, हेमंत पाडळे, रेव्ह.अनिल अंधारे, प्रविण प्रभुने, राहुल देठे आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना प्राचार्य डॉ.बार्नबस म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रासाठी प्रोत्साहत केले जाते. विद्यार्थ्यांनीही देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात कॉलेजच्या लौकिकात भर घातली आहे. सर्वांच्या सहकार्याने कॉलेजची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. मिळालेला पुरस्कारात सर्वांचेच श्रेय आहे. चर्चवतीने केलेल्या सत्काराने प्रेरणा मिळणार असून, यापुढील काळात महाविद्यालयाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.
याप्रसंगी डॉ.जॉन उजागरे यांनी अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रगतीतील प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या योगदानाविषयी माहिती दिली.