सलून व्यावसायिकाचा मुलगा मयूर भुजबळ झाला सी.ए.

0

नगर – नगर येथील सलून व्यावसायिक अशोक भुजबळ यांचे चिरंजीव मयूर याने मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टड अकौंटंट फायनल परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.

     मयूर याने स्वत: वडिलांना सलून व्यवसायामध्ये मदत करुन  इ.10वी व 12 वी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथे एसआरजीएस असोसिएटसमध्ये आर्टिकलशिप केली. त्यास सीए महादेव फुलारी, नगर येथील सीए पवनकुमार दरक, घन:श्याम सोळंकी यांचे मार्गदर्शन लाभले.

     मयूर भुजबळ याच्या यशाबद्दल त्याचे काका महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र भुजबळ, विक्रम भुजबळ यांच्यासह नाभिक समाजाने अभिनंदन केले.

     आपला पारंपारिक व्यवसाय सांभाळून शिक्षण पूर्ण करीत मयुर याने आज सी.ए.परिक्षेत मिळविलेले यश हे त्याच्या कष्टाचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया वडिल अशोक भुजबळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here