जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनास जागे करण्यासाठी हलगीनाद आंदोलन सुरू !

0

सातारा/अनिल वीर : अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत हलगी नाद आंदोलन सुरू झालेले आहे.

    महागाईचा विचार होवून तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्णयास अनुसरून महिलांच्या मानधनात रु. १२००० / – अंतरीम वाढ सप्टेंबर २०२२ पासून मिळावी. सर्व मिनी सेविका यांना समान काम समान वेतन या कायदेशीर व घटनात्मक तरतूदीप्रमाणे त्यांची नेमणुक तारखेपासून मोठ्या अंगणवाडी दर्जा व मानधन फरकासह मिळावे. सेवानिवृत्त झालेल्या सेविका / मदतनीस यांना एकरकमी पेंशन थकित व्याजासह मिळावी.तसेच त्यांची होणारी आर्थिक अडचण दूर व्हावी.थकित आहार बिले,टि.ए. डी.ए.च्या रक्कमा व इतर येणे बाबी रक्कमा मिळाव्यात . मासिक मानधना एवढी भाऊबीज ( बोनस ) मिळावा . कोव्हिड – साथीच्या वेळी महामारी रोखणेचा प्रयत्न करताना बाधित झालेल्या अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनीताई यांनी केलेल्या ओषधोपचाराचा खर्च त्यांना मिळावा.कामाच्या ओझ्यामुळे आजारी झालेल्या महिला पूर्ण बऱ्या होईपर्यंत त्यांना मानधन मिळावे.पर्यवेक्षिका भरती सरकारी वकीलांचे दुर्लक्षामुळे गेली ९ वर्षे होवू शकली नाही. सुप्रिम कोर्टात याचिका प्रलंबित आहे.गुणवत्ता प्राप्त ३० ते ४० सेविकांचे मासिक ३० ते ३५ हजारो नुकसान होत आहे. सरकारी वकिलांना योग्य सूचना मिळाव्यात अथवा नवीन वकील नेमणुक होवून महिलांचे नुकसान टाळले जावे.सेविका / मदतनीस यांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात.गेली १० ते १५ वर्षे काही महिला एकट्याच दोन्ही पदाचे काम करीत आहेत.त्यांनी केलेल्या कालावधीचे त्यांना मासिक रु. २५००/-  प्रमाणे अतिरिक्त मानधन मिळावे. अंगणवाडी कामकाज ४ तासाचे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत असे आहे. मात्र,त्यांचेकडून जादा तास जिल्हा प्रशासनाने करवून घेतले आहे. दुपारी खाजगी काम करून अर्थाजन करणेची संधी हिरावून घेतली आहे.त्यामुळे सर्व महिलांना वार्षिक रु. ३०,०००/- (मासिक रु.२५००/- प्रमाणे) अतिरिक्त मानधन त्यांना मिळावे . अत्यंत महत्वाचे म्हणजे दिपावली २०२२ पुर्वी कोव्हिड -प्रोत्साहन भत्ता मिळणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका / मदतनीस  या ग्रामीण / शहरी यांनी जीवावर उदार होवून कोव्हिड महामारी रोखण्यात राज्यात जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक मिळवून दिला आहे . तरी जिल्ह्यातील ३,८६२ सेविका, ३,४१० मदतनीस, ८१३ मिनी अंगणवाडी ताई,नागरी प्रकल्पाच्या ११७ सेविका व ७२ मदतनीस यांना प्रत्येकी रु.२१,०००  प्रमाणे कोव्हिड १९  प्रोत्साहन भत्ता दिपावली २०२२ पुर्वी त्यांच्या खात्यावर जमा व्हावा. याबाबत जिल्हाधिकारी यांनी विकास निधीतून रक्कम देणेबाबत आदेश द्यावेत. यासंदर्भात, वारंवार जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन आंदोलनही केलेली आहेत. अंगणवाडी बालकांना प्रति लाभार्थी रु.८/- अनुदान नाष्टा व दुपारी जेवणासाठी मिळते . ते रु.१८/- मिळावे.बचतगट आहारासाठी तयार होत नाहीत. तरी या प्रक्रियेत सेविका / मदतनीस यांना सुप्रिम कोर्टाचे आदेशाप्रमाणे त्रास न देता आहारासाठी बचत गट पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सूचित करावे . बालकांना उत्तम आहार मिळण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.सदरचे आंदोलन सुरू असल्याने आहार बंद आंदोलन आहे.तेव्हा याबाबत सेविका / मदतनीस यांना जबाबदार धरता येणार नाही.थकित ५ महिन्याची आहार बिले मिळावीत. अंगणवाडी महिला इतर कर्मचाऱ्यापेक्षा जास्त काम करतात. प्रामाणिकपणे काम करतात. हे शासनाने वेळोवेळी मान्य केले आहे.त्यांना गरजे इतका पगार मिळाला तर त्यांच्याकडून समाजाच्या विकासाचे काम उत्तमरित्या होईल. तेव्हा त्यांच्या मागण्याबाबत महाराष्ट्र व केंद्र शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सेवानिवृत अंगणवाडी सेविका / मदतनीस यांनी अत्यल्प मानधनात कामकाज केले आहे. त्यांच्या मानधनाचा बराचसा भाग शासकिय कामाकरीता त्यांनी खर्ची केलेला आहे . सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जीवन जगता येणे अवघड होत आहे . समाजाच्या विकासाचे काम करणाऱ्या या महिलांना मासिक पेंशन कृती समितीने दिलेल्या पेंशन अहवालानुसार मिळावी . तसेच ग्रॅज्युएटी मिळावी.दि.६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर अखेर महिलांच्या आंदोलनातील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून पुन्हा सदरचे आंदोलन सुरू झालेले आहे.

       सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षका व सेविका संघाचे महासचिव शौकत पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.यावेळी सुजाता रणवरे, मनिषा चव्हाण, छाया पन्हाळर, अर्चना अहिरेकर आदी सेविका – मदतनीस उपस्थित होत्या. आंदोलनास पाठींबा अनेकांनी भेट देऊन दिला आहे.

फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनप्रसंगी शौकत पठाण,सत्यनारायण शेडगे,अनिल वीर व अंगणवाडी सेविका-मदतनीस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here