ग्रामिण भागात दामिनी पथकाची उदानसिता…!

0

विद्यार्थींनीना पडला  प्रश्न दामिनी व निर्भया पथक कशाला म्हणतात !

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

                     राहुरी तालुक्यातील महिला, मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.राहुरी तालुक्यात भरोसा सेलच नसल्याने व  पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या महिलेला उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने “भिक नको पण कुञे आवरा” अशी अवस्था महिलांची होत असल्याने तक्रार करण्यास महिला धजवत नाही.पोलीसांचा गेल्या कित्येक दिवसांपासून उरफाटा कारभार सुरू आहे. शाळा,महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरांना ‘धडा’ शिकविण्याचे सोडून भलत्याच कामांमध्ये व्यस्त असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले असून, टवाळखोरावर कारवाई करण्यासाठी राहुरी तालुक्यात पोलीसांचे स्वतंञ पथक अथवा  दामिनी पथकच नसल्याने पोलीस प्रशासनाला कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसत आहे.

       पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी भर दिवसा एका मुलीवर तरुणाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तसेच कोपरगावच्या तरुणीवर रायगडाच्या पायथ्याशी घडलेल्या घटनेत दर्शना पवार खुन झाला.तीचे स्वप्न अधुरेच राहिले.  नगर जिल्ह्यातील ग्रामिण भागातील महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.?

              महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात  पोलिसांच्या वतीने दामिनी, निर्भया पथकाची स्थापना केली.आहे. या पथकांकडून टवाळखोरांवर धडाकेबाज कारवाईची अपेक्षा असते. मात्र, राहुरी तालुक्यातील  माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व काही भागातील महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओकडून मुलींना छेडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. छेडछाड,विनयभंगाचे दरदिवशी गुन्हे  होत आहेत. मात्र, पोलिसांची दामिनी व निर्भया पथके कुठेच कारवाया करताना दिसत नाहीत.सकाळी व सायंकाळी शतपावली करणाऱ्या आलेल्या महिलांची टवाळखोर छेड काढीत आहेत. त्यामुळे  मुली, महिला ‘निर्भय’ कशा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा,महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याची जबाबदारी दामिनी पथकावर असते. परंतु, त्याचाही विसर पडलेला आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामिण भागातील अल्पवयीन मुली, विद्यार्थिनी तसेच महिलांची छेडछाड, विनयभंग अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक राकेश ओला भरोसा सेल बाबत काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

              पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शालेय विद्यार्थींनीची भर रस्त्यात टवाळखोरांनी छेड काढल्याने संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला अशा अनेक घटना राहुरी तालुक्यात दररोज घडत असतात.परंतू “भिक नको पण कुञे आवरा” अशी म्हण्याची वेळ विद्यार्थीनी व महिलावर आली आहे. 

महिला,तरुणी, विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विविध समस्या, मंग़ळसूत्र हिसकावणे, शाळा, कॉलेज ठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास कमी व्हावा, महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी महिला मार्शल पथक ‘दामिनी’  सुरू झाले होते. महिलांनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, सोसायट्या, कॉलन्यांमध्ये काही समस्या असल्यास ती माहिती देण्याची जबाबदारी महिलांची आहे. तरच अप्रिय घटनांना आळा बसेल.दामिनी पथकातील महिला पोलिसांना फोन केल्यास काही वेळातच आपल्याला ही मदत मिळणार आहे. आपल्या परिसरात काही संशयित तरुण, चोरटे फिरत असतील तर त्याचीही माहिती द्यावी. शाळा, कॉलेज परिसरात पथकाकडून सक्षमपणे पेट्रोलिंग करण्याची गरज आहे.

 @ तक्रार न केलेलीच बरी

            महाविद्यालय व शाळा परिसरात विद्यार्थींनीची तर  शतपाऊली करणाऱ्या महिलांची टवाळखोरांकडून छेडछाड केली जाते.या टवाळखोरांच्या विचिञ हावभावांना महिलावर्ग ञस्त झाल्या आहे.हिम्मत करुन एखादी महिला तक्रार देण्यासाठी पुढे येते.परंतू तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना पोलीस कर्मचारी अरेरावीची भाषा करत तक्रारदारालाच ‘दम’ देतात.उलट सुलट प्रश्न विचारुन टवाळखोरांच्या हावभावा पेक्षा पोलीसांच्या भाषेमुळे महिलांचा खरोखर विनयभंग होत असल्याने तक्रार न केलेलीच बरी,असे तक्रारदार महिलांकडून ऐकावयास मिळते.

@विद्यार्थींच्या शिक्षणावर टांगती तलवार!

                       अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामिण भागातील माध्यमिक शाळा व  महाविद्यालय परिसरात शहरा प्रमाणेच टवाळखोर रायर्डस,विचिञ हावभाव करणारे टवाळखोर टोळके जागोजागी उभे राहुन छेडछाड करीत असतात याबाबत शाळा व महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींशी संवाद साधला असता टवाळखोरांकडून दररोजच ञास होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करुन आपल्या शिक्षणाकडे लक्ष देत राहतो.हा सर्व प्रकार घरी सांगावा तर ग्रामिण भागातील पालक आमच्या सारख्या मुलीचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतात.शिक्षण बंद होवू नये म्हणुन बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागते.महिला व विद्यार्थींनीच्या सुरेक्षितेसाठी  दामिनी पथकाची स्थापना केल्याचे वृत्तपञातून वाचायला मिळते.दामिनी पथक असते हे सुद्धा पहायला मिळाले नाही.असे पथक असते ते वृत्तपञात वाचायला चांगले वाटते प्रत्याक्षात या पथकाचे कार्य काय असते हे सुद्धा आम्हाला माहिती नाही.असे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी सांगितले.

@ पोलीसांची उदानसिता 

           ग्रामिण भागातील विद्यार्थींनी व पालक प्रतिष्ठेपायी टवाळखोरांविरोधात तक्रार कण्यास धजवत नाही.चुकुन एखादी महिला किंवा विद्यार्थींनी तक्रार देण्यास पुढे आली तर पोलीसांच्या विविध प्रश्नाला उत्तरे देताना नाकी नऊ येतात.महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस अधिकाऱ्यांची अदानसिता दिसुन येते.

@ दामिनी व निर्भया पथक कशाला म्हणतात !

            राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ, राहुरी, राहुरी काँलेज, राहुरी फँक्टरी, देवळाली प्रवरा, तांभेरे, टाकळीमिया, महाडुक सेंटर,मांजरी, वळण,कोपरे,ताहराबाद,म्हेसगाव,वांबोरी,खडांबे,आरडगाव,आंबी,चांदेगाव,चिंचोली,कोल्हार आदी भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तर तीन ते चार ठिकाणी महाविद्यालये आहेत.हि सर्व विद्यालये राहुरी पोलीस स्टेशनच्या कक्षेत येतात.या ठिकाणी दामिनी किंवा निर्भया पथक नजरेस पडले नाही.येथिल विद्यार्थींनीना दामिनी किंवा निर्भया पथकाने सुरेक्षेचे धडे हि गिरविले नसल्याने दामिनी व निर्भया पथक कशाला म्हणतात याचीच माहिती नसल्याचे विद्यार्थींनी सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here