देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२३-२४ (खरीप हंगाम) या विषयावरील एक दिवसाचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, नारायणगांव येथे आयोजित करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव व शिरुर या तालुक्यातील कृषि अधिकारी अधिकाऱ्यांना खरीप हंगामातील पिकांवरील किडी व रोगांबाबत माहिती देण्यासाठी राजगुरुनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.सखाराम आघाव यांनी सोयाबीन पिकावरील महत्वाच्या किडी व त्यांच्यावर पडणारे रोग त्या रोगावरील नियंत्रण तसेच मका पिकावरील अमेरिकेन लष्करी अळीचे नियंत्रण कसे करायचे याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. चांगदेव वाळ यांनी कडधान्यांची शेती ही पुस्तिका तुरीची सुधारीत पद्धतीने लागवड ही घडीपत्रिका व महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या सन २०२३ या सालाची कृषिदर्शनीचे पुस्तिकीचे उपस्थित प्रमुख शास्त्रज्ञाच्या हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमाला उपविभागीय कृषिसतिश शिरसाठ,अधिकारी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील किटकशास्त्र विभाग सहाय्यक शास्त्रज्ञ प्रा. डॉ.सखाराम आघाव, जुन्नर तालुका कृषी अधिकारी योगेश यादव, आंबेगांव तालुका कृषि अधिकारी वाणी, शिरुर तालुका कृषि अधिकारी वेताळ, डवळे आणि चारही तालुक्यातील कृषी मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व कृषीसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडधान्यांची शेती या पुस्तिकेत तुरी पिकाच्या लागवडीपासून ते
काढणीपर्यत संपूर्ण माहिती या पुस्तिकेत दिली आहे. या पुस्तिकेव्दारे
शेतकरी तुरीचे पिकांचे भरघोस उत्पन्न घेउ शकतो, अशी माहिती शास्थज्ञ
डॉ. चांगदेव वायळ यांनी दिली.