ढोरकिन येथे अरावली सोशल फाउंडेशन औरंगाबादद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न.

0

पैठण,दिं.१३.(प्रतिनिधी) :ढोरकिन येथे अरावली सोशल फाउंडेशन औरंगाबाद द्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न.

आज गुरुवार दिनांक 13 /7/2023 रोजी ढोरकिन येथे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी महिपालसिंग चांदा यांच्या मार्गदर्शनातून मुलांना परिपूर्ण माहिती दिली. चांदा सरांनी मुलांसाठी स्वखर्चाने ढोरकीन येथे जागा विकत घेतली आहे . त्यामध्ये सर्व सुविधायुक्त असे संकुल उभारणार आहे तथा एकाच छताखाली सर्व प्रकारच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे ते स्वतः सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी आहेत त्यांच्या मनात ग्रामीण भागातील तरुणांसाठी / विद्यार्थ्यांसाठी खूप तळमळ आहे. त्यासाठी हा उपक्रम त्यांनी ग्रामीण भागातच राबवण्याचे ठरवले आहे. 

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले फॉरेस्ट ऑफिसर  रावसाहेब काळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले धनंजय आकात सर रीलायबल अकॅडमी छत्रपती संभाजीनगरचे संचालक यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच रावसाहेब मुळे, श्री शिसोदे सह आदी उपस्थित होते.

      या कार्यक्रमात डॉ जीवन राजपूत  यांना ए.पी.जे अब्दुल कलाम  जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच नुकतेच पी.एस.आय पदी नियुक्त झालेले. रघुवीर खोडा,  सविताताई परदेशी,  विद्याताई परदेशी, किसन बहुरे , वीरेंद्र खंडारे,  कांचन जारवाल. तसेच इंग्रजी या विषयात सेट परीक्षा पास झालेल्या सविताताई करतारसिंग राजपूत, व  एम.पी.एस.सी परीक्षेतून मंत्रालयात लिपिक पदावर निवड झालेले विद्यार्थी मनोज कहाटे , विशाल परदेशी, आकाश नागलोत व एम. एस. एफ. मध्ये निवड झालेल्या प्रतीक्षा बेडवाल , अनिता डेडवाळ , प्रतीक्षा गोमलाडू या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एडवोकेट तुषार राजपूत यांची एल .एल. एम साठी हावर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

   या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त डी. वाय .एस. पी. सी .डी शेवगण सर अशोकसिंग शेवगण सर,  तोताराम बहुरे सर , डॉ. जीवनसिंग राजपूत सर,  रावसाहेब काळे सर,  रावसाहेब मुळे सर , शिसोदे सर,  पोलीस कॉन्स्टेबल करतारसिंह सिंगल सर, व परिसरातील सर्व शाळांचे शिक्षक वृंद ई.उपस्थित होते. 

 या कार्यक्रमासाठी भोजनाची व्यवस्था मनिंदर सिंग राजपूत , विजय परदेशी , चेतन राजपूत, भगवान डेडवाल सर , यांनी स्वखर्चातून केली . तसेच यासाठी विशेष परिश्रम भगवानसिंग डेडवाल सर,  महिपालसिंग चांदासर , नामदेव परदेशी , विक्रमसिंग चांदा,  मंगलसिंग सिंगल,  कैलाससिंग राजुरे यांनी घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नूतन राजपूत व इंजिनियर पूजा छानवाल यांनी  केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक चरण सिंग राजपूत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here