टेम्पो-रिक्षाच्या भीषण अपघातात पाच ठार, दोन जखमी, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील घटना

0

जाफ्राबाद /जालना : भरधाव जाणाऱ्या टेम्पो आणि अॅपे रिक्षाच्या झालेल्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात जालना जिल्ह्यातील जाफराबाद माहोरा – भोकरदन रस्त्यावर आज दिनांक १७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला . यामध्ये परवीन बी राजू शहा ( वय २५ ), आलिया राजू शहा (वय , ७ ), मुस्कान राजू शहा ( वय ३), कैफ अशपाक शहा ( १९ ) आणि मनीषा तिरुखे (वय २६ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जालन्यातील जाफराबाद-भोकरदन रस्त्यावर माहोरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

अपघातातील सर्व मयत हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहे. हे एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्रित रित्या ऑटो रिक्षाने गेले होते,अपघातात ऑटो रिक्षातील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर दोघांना माहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जालना येथे हलविण्यात आले.हा अपघात एवढा भीषण होता की टेम्पोच्या धडकेत रिक्षाचे अवशेष तुटून सर्वत्र विखुरले होते. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी रूग्णालयता दाखल केले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असून पोलिस याबाबत अधिक तपार करत आहेत.
ही धडक एवढी भीषण होती की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये दोन महिला आणि ती पुरुषांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here