सातारा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्वपूर्ण कार्य करते.तेव्हा वृक्षारोपणसह वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे.असे प्रतिपादन सरपंच अल्सम मुलाणी यांनी केले.
शेंद्रे,ता.सातारा येथे चंद्रकांत खंडाईत यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीरंग वाघमारे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा सरपंच बोलत होते.प्रामुख्याने बोधिवृक्ष विहारच्या परिसरात खंडाईतआप्पा यांच्या हस्ते संपन्न झालेल्या कार्यक्रमास वामन गंगावणे,अनिल वीर,सुनील निकाळजे, वसंत खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समाधान वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,ग्रामस्थ, उपासक-उपासिका उपस्थित होत्या.