चांदोली परिसरात अतिवृष्ठी कायम 

0

गणेश माने, वारणावती :

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण परिसरात सध्या पाऊसचा जोर कायम  असून गेल्या 24 तासात 57 मिलिमिटर तर सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत 20 मिलिमीटर असा एकूण 32 तासांमध्ये  77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . तर आज अखेर 949 मिलिमीटर पावसाची नोंद चांदोली येथील पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे पाऊस संततधार चालूच आहे त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे

       चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. धरणात 12398 क्यूसेक्स  पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात 27.23 टीएमसी पाणीसाठा झाला असुन . धरण  79.15 टक्के भरले आहे  जलविद्युत केंद्रातून वारणा नदी पात्रात 897 क्युसेक प्रति सेकंद पाणी बाहेर पडत आहे .यामुळे वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.

पाऊसाचा जोर कायम असल्याने कोणत्याही क्षणी वारणा धरणाच्या साडव्या मधून पाणी सोडण्यात येईल नदी काठच्या लोकोनी सर्तक राहावे 

मिलिंद किरवाडकर उपविभागीय अभियंता वारणा कालवे विभाग वारणावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here