वारणावती वार्ताहर
शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सातत्याने पडत आहे २०१९ व२०२१ झालेल्या अतिवृष्टीमुळे मणदूर पैकी मिरुखेवाडी आरळा पैकी कोकणेवाडी बेरडेवाडी भाष्टेवस्ती गावच्या गावठाणाखालील डोंगरात भूस्सलखन झाले होते. तेव्हापासून येथील लोक भितीच्या छायेखाली वावरात आहेत. याही वर्षी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरुखेवाडी कोकणेवाडी भाष्टेवस्ती बेरडेवाडी या डोंगर दऱ्यात असणाऱ्या गावच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार सौ. शामला खोत- पाटील व एनडीआरएफ् चे अधिकारी यांनी या गावांना भेटी दिल्या. भेटी दरम्यान तहसीलदार व अधिकारी यांनी डोंगर दऱ्याजवळ असणाऱ्या कुटुंबाच्या कोणत्या अडचणी आहेत व येणाऱ्या अडचणीवर कशी मात करता येईल याची माहिती एन डी आर एफ च्या टिमने दिली व प्रत्येक गावामध्ये पाच ते दहा लोकांचा चमू तयार ठेवणे बाबत स्थानिक नागरिकांना सुचना देण्यात आल्या आहेत
जुलै २०२३ मध्ये अतिवृष्ठी मुळे शिराळा तालुक्यातील डोंगर माथ्या वरील नागरिक वस्ती नजिक भूस्कलन होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरिकांना सुरक्षीत स्थलातरीत करण्याची अवशक्ता भासल्यास त्याना अन्न पाणी वैधकीय सुविधा देणेसाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत या क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी याना नैसर्गिक आपती कालावधीमध्ये संबंधित अधिकारी कर्मचारी यांना आपल्या मुख्यालयाचे ठिकाणी उपस्थीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच पाऊसाचा जोर कायम राहिल्यास तात्काळ करुंगली येथील मंगल कार्यालयात मध्ये स्थलांतरित करण्यात येईल नागरिकांनी सर्तक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मिरुखेवाडी व भाष्टेवस्ती येथील ग्रामस्थानी कायमच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे
स्थानिक ग्रामस्थाच्या पूर्नवसाच्या मागणीवरून तहसिल कार्यालय प्रस्ताव तयार करून तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविणार
सौ . शामला खोत – पाटील
तहसीलदार शिराळा