तणनाशक कंपनीकडून चांदेकसारे येथील शेतकऱ्यांची फसवणूक..कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार.. सुनील होन

0

सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकातील तण नाहिसे करण्यासाठी फवारलेल्या तणनाशकानेपिकातील तण नाहीसे झाले नसून या संदर्भात संबंधित एफएमसी कंपनी गॅलेक्सी नेक्स्ट यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी हात वर केले असून संबंधित कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनाही या संदर्भात निवेदन देऊन न्याय मागणार असल्याचे शेतकरी सुनील पांडुरंग होन यांनी सांगितले.चांदेकसारे येथील सर्वे नंबर 208 मध्ये 14 एकर सोयाबीन मध्ये संबंधित कंपनीचे तणनाशक फवारण्यात आले होते. कोपरगाव येथील कृषी दुकानातून ही औषधे खरेदी केली होती. साधारण १४ एकर फवारणीसाठी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च झालेला आहे. 20 जुलै 2023 रोजी या तननासकाची फवारणी शेतकरी सुनील पांडुरंग होन (४ एकर) अनिल पांडुरंग होन (५ एकर) मंजुषा सुनील होन (१ एकर) व अमृता अनिल होन (४ एकर ) यांनी आपल्या सोयाबीनच्या शेतात केली होती.कंपनीच्या सेल्समन अधिकाऱ्यांकडून सोयाबीन मधील केना व काँग्रेस हे गवत समुळ नष्ट होईल असे सांगण्यात आले होते.मात्र दहा दिवस उलटून देखील केना,काँग्रेस व इतर गवत या तणनाशकाने जळाले नसल्याने शेतकऱ्यांनी एफ एम सी कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांचे शेत गाठले. आपल्या तणनाशकांचा रिझल्ट मिळाला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतकऱ्यांच्या समोरच त्यांनी वरिष्ठांशी संपर्क केला मात्र कंपनीने हात वर केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.याच कंपनीचे किटकनाशके देखील शेतकरी फवारतात मात्र आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.बी बियाणे सह कीटकनाशक व तन नाशकामध्येही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांना वाली कोणी उरला नाही का असा प्रश्न सुनील होन उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना या संदर्भात निवेदन देणार असल्याचे सांगत कंपनी विरोधात न्यायालयात दावा ठोकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संबंधित तणनाशकाचे बॉटल व उरलेले औषध कृषी विद्यापीठात जाऊन कृषी अधिकाऱ्यांशी देखील या संदर्भात चर्चा करण्यात असल्याने होन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here