राहुरी तालुक्यात धर्मांतरासाठी अल्पवयीन मुलींवर दबाव 

0

आ.प्रसाद लाड यांनी विधानसभेत उठविला आवाज 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

         राहुरी तालुक्यातील उंबरे परिसरातील दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाब टाकल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलीने स्वतंत्र फिर्याद दिल्याने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.विधानसभेत आ.प्रसाद लाड यांनी लक्षवेधीतुन उंबरे येथिल घटनेवर प्रकाश टाकला आहे.

                  राहुरी तालुक्यातील उंबरे येथिल अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाब टाकल्याप्रकरणी पहिल्या फिर्यादित १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने म्हंटले की, सन २०२१ ते दि. २६ जुलै २०२३ या कालावधीत आवेज शेख हा हिना शेख यांच्याकडे खाजगी शिकवणीसाठी जात असताना पाठलाग करुन मला थांबवुन “तु मला खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा व तु हिना यांच्या खाजगी शिकवणी वर्गात गेल्यावर तुम्ही मुस्लिम मुला-मुलींशीबोलत जा, असे सांगुन आरोपी आवेज शेख यांच्याशी जाणीवपूर्वक बोलायला शेख यांच्याशी जाणीवपूर्वक बोलायला लावुन त्यास चिथावणी दिली. त्यानंतर आवेज शेख याने पिडीत मुलीस इन्स्टाग्राम अकाऊन्टवरुन व फोन वरून तिस मी माझा हात कापुन घेईल व माझा जिव देईल, तुला व तुझ्या घरच्यांना गुंतवेल अशी धमकी देवुन तिच्याशी बळजबरीने ओळख केली. त्यानतंर आरोपी आवेज शेख व कैफ शेख यांनी मोटारसायकलवर पाठलाग करुन तिस पुन्हा धमकी दिली त्यानंतर आरोपी आवेज शेख व कैफ शेख, हिना शेख, सोहेल शेख, शाकिर सय्यद, सलिम पठाण, हुसेन शेख (भैय्या),अल्ताफ शेख(सर्व रा.उंबरे ता . राहुरी यांनी पिडीतास थांबवुन “तु आवेश शेख यांचेशी मैत्री कर, तो तुझ्याशी लग्न करेन. आम्ही तुमचे लग्न लावुन देऊ, सगळा खर्च आम्ही करु, तुझ्या वर्गातील मुलींसोबत ओळख करून दे आम्ही त्यांच्याशी लग्न करु.’ असे बोलले त्यानंतर पिडीतास तु हिंदु धर्म सोड आमचे मुस्लिम धर्म स्विकार कर तु बुरका घालत जा म्हणजे हिंदु मुले तुला त्रास देणार नाहीत त्यांची वाईट नजर तुझ्यावर पडणार नाही. तु बांगड्या घालत जावु नकोस, कपाळावर गंध व टिकली लावत जावु नको, मला ते आवडत नाही आमच्या मुस्लिम धर्माच्या मुली जशा राहतात तशा राहत जा.आपण लवकर घर सोडुन पळुन जाणार आहेत त्या करता,आपल्याला असे बोलुन कैफ शेख, हिना शेख, सोहेल शेख, शाकिर सय्यद, सलिम पठाण, हुसेन शेख (भैय्या), अल्ताफ शेख( सर्व रा. उंबरे ता. राहुरी) आपल्याला मदत करणार आहेत व पैशाची मदत करणार आहेत असे सांगुन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली व एक दिवस रात्रीचे वेळी पिडीताचे घराचे पाठीमागे येवुन पिडीता सोबत फोटो काढून तीच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आवेज शेख कैफ शेख, हिना शेख, सोहेल शेख, शाकिर सय्यद, सलिम पठाण, हुसेन शेख (भैय्या), अल्ताफ शेख( सर्व रा.उंबरे ता. राहुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         धर्मांतराच्या व विनयभंगाच्या दुसऱ्या घटनेची फिर्यादित १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, आवेज निसार शेख व कैफ शेख हे पिडित फिर्यादीचा वारंवार पाठलाग करुन आवेज शेख यानी फिर्यादी हीचे सोबत ओळख निर्माण करून तिच्याशी मैत्री वाढवुन “तुम्ही खुप छान दिसता माझे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याशिवाय मी राहु शकत नाही” असे म्हणुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न केली तसेच फिर्यादीस वारंवार इन्साटाग्रामवर मेसेज करुन तुम्ही आमचे मुस्लिम धर्मात या मुस्लिम धर्मात आल्यावर तुम्हाला आम्ही बुरखा घालायला देऊ,बुरखा घातल्यानंतर हिंदु मुले तुम्हाला त्रास देणार नाही व तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहणार नाही. मुस्लिम धर्मात आल्यानंतर तुम्हाला बांगड्या,कुंकु,टिकली लावता येणार नाही. तुम्हाला मुस्लिम मुलीसारखे वागावे लागेल, असे म्हणुन आरोपी हिना शेख हिने फिर्यादीस तुम्ही नेहमी हिंदी मध्ये बोलत जा, मुस्लीम मुलामुलींशी बोलत जा. त्यांच्याशी मैत्री वाढत जा. तुम्हाला इथुन पुढे आमच्या सारखे वागायचे आहे व रहायचे आहे असे वारंवार बोलुन आवेश शेख याच्याशी बोलण्यास प्रवृत्त केले आहे. व आरोपी आलिशा शेख हिने आवेज शेख याचा मोबाईल वरुन पीडित फिर्यादिस फोन करून वेळोवेळी आरोपी आवेज शेख याचे बोलणे करुन देऊन पीडित फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यासाठी आवेज शेख याने प्रवृत्त केले हे. कैफ शेख, सोहेल शेख, हिना शेख, आलिशा शेख, सलिम पठाण, अल्ताफ शेख, शाकिर सय्यद ( सर्व रा.उंबरे ता . राहुरी) यांनी सदर गुन्ह्यातील आवेज शेख यास गुन्हा करण्यास मदत केलयाप्रकरणी आवेज शेख कैफ शेख, सोहेल शेख, हिना शेख, आलिशा शेख, सलिम पठाण, अल्ताफ शेख, शाकिर सय्यद ( सर्व रा. उंबरे ता. राहुरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मांतराच्या मुद्द्यावरुन राहुरीच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी ! पुन्हा पुर्नआवृत्ती नको?

           राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी उंबरे परीसरातील मिशनरी धर्मांतराच्या मुद्द्यावरुन आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी करुन धर्मांतराचा मुद्दा गाजविला होता.गृहराज्यमंञी शंभुराजे देसाई  यांनी कर्तव्यनिष्ट तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी उचलबांगडी करुन वरीष्ठ आधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते.पोलीस निरीक्षक दराडे यांची चौकशी पुर्ण होवुनही गृहराज्यमंञी चौकशी अहवाल जाहिर केला नाही.तोच पुन्हा उंबरे गावात धर्मांतराचा प्रश्न उभा राहिला आहे.आ.प्रसाद लाड यांनी विधानसाभेत लक्षवेधी केली.यावर सभापती निलम गोऱ्हे यांनी आयपीस अधिकाऱ्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.तत्कालीन कर्तव्यनिष्ट पोलीस निरीक्षक दराडे धर्मातराच्या प्रश्नावर राजकीय बळी ठरले. त्याच प्रमाणे उंबरे येथिल धर्मांतराचा मुद्दा आ.लाड यांनी लक्षवेधी केला आहे.त्यास गृहमंञ्यांकडून उत्तर मिळाले नसले तरी सभापती निलम गोऱ्हे यांनी पोलीस दलातील वरीष्ट अधिकाऱ्यां मार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मांतराच्या प्रश्नावर पुन्हा राहुरीचा अधिकारी बळीचा बकरा ठरु नये पुन्हा पुर्नआवृत्ती होवू नये अशीच काही नागरीकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here