न्यायालयापेक्षा तुम्ही मोठे आहात का? : आमदार शिवेंद्रराजे भोसले

0

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका

सातारा : साताऱ्यात खिंडवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जागेवर जनावरांचा आठवडी बाजार भरवण्यात आला आहे. याचे उद्घाटन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.

स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलं की अडवायचं, काम होऊन द्यायचं नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट पेक्षा तुम्ही मोठे आहात का? देशात लोकशाही आहे. असल्या गोष्टींना कोण भीक घालत नाही. भिडे गुरुजी यांनी केलेले विधान चुकीचे आहे. कोणत्याही महापुरुषांबद्दल विधान करणे चुकीचं आहे. सर्वांनी महापुरुषांबद्दल बोलताना स्वतःला आवरलं पाहिजे असे सांगत भिडे गुरुजींनी केलेल्या विधानावर त्‍यांनी नाराजी व्यक्त केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here